उबेर चालकाकडून अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन विनयभंग, दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई : उबेर चालकाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पवई येथे राहणारी 14 वर्षीय मुलीने मंगळवारी दुपारी 4.30 दरम्यान दादर प्रभादेवी येथून घरी जाण्यासाठी उबेर अॅपवरुन कार बुक केली होती. उबेर चालकाने मुलीने दिलेल्या पवई येथील घराच्या दिशेने कार न घेऊन जाता इस्टन एक्सप्रेसकडे कार निर्जनस्थळी नेल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे. तसेच उबेर चालकाकडून मुलीसोबत गैरवर्तन करत तिची छेड काढल्याचा आरोप तक्रारीत मुलीने केला आहे.
दादर पोलिसांकडून उबेर चालकावर गुन्हा दाखल
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी उबेर चालकावर 75, 79 बीएनएस 2023 सह कलम 12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दादर पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, उबेर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा तपास घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मर्दानी… कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
अधिक पाहा..
Comments are closed.