Mumbai Crime Dancer: मुंबईत 32 वर्षांच्या डान्सर तरुणीवर अत्याचार, बड्या नृत्य प्रशिक्षकाला अटक


मुंबई गुन्हेगारी बलात्कार प्रकरण: मुंबईतील बॉलीवूड इंडस्ट्रीत नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरे पोलिसांनी 22 वर्षीय नृत्य प्रशिक्षक आणि इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या तरुणाला एका 32 वर्षीय व्यावसायिक नृत्यांगनेवर बलात्कार (Rape Case) केल्याप्रकरणी अटक केली आहे. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार आता दाखल करण्यात आली आहे. पीडिता अंधेरीत राहणारी असून ती चित्रपट व स्टेज शोमध्ये बॅकग्राऊंड नृत्यांगना (Background Dancer) म्हणून काम करते. आरोपी हा मालाडचा रहिवासी असून डान्स कोच व कार्यक्रम आयोजक आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आरे पोलिसांनी (Mumbai Police) भा.न्या.सं.च्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून तो सध्या पोलीसकोठडीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराचा आरोपी असलेला नृत्य प्रशिक्षक आणि पीडित तरुणीची भेट जानेवारी महिन्यात गोवा येथे झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात हे दोघे पुन्हा भेटले. त्यावेळी पीडित तरुणी ही कामाच्या शोधात होती. तेव्हापासून या दोघांमध्ये संवाद सुरु झाला. यानंतर नृत्याच्या सरावासाठी आरे कॉलनीतील रॉयल पाम येथे भाड्याने घेण्यात आलेल्या बंगल्यात हे दोघेजण भेटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा सराव सुरु होता. एक दिवस नृत्याचा सराव सुरु असताना आरोपीने आपल्याला बिअर प्यायला दिली आणि दोघांना नशा चढली. त्यानंतर हे दोघे वॉटर कॉन्टॅक्ट डान्सचा सराव करण्यासाठी स्विमींग पूलमध्ये उतरले. तोपर्यंत खूप रात्र झाल्याने दोघांनी आरे कॉलनीतील बंगल्यातच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, रात्री नृत्य प्रशिक्षकाने नशेत असल्याचा फायदा घेऊन तरुणीवर दोनदा बलात्कार केला, असे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या सगळ्या प्रकाराचा तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यामुळे तरुणीला पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यास उशीर झाला. त्यामुळे संबंधित तरुणीने सहा महिन्यांनी तक्रार दाखल केली. गेल्या महिन्यात ही तरुणी आमच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. आम्ही तिचा जबाब नोंदवून घेतला आणि संबंधित नृत्य प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. याप्रकरणाची सध्या चौकशी केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक संपत घुगे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या देखरेखीत या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

https://www.youtube.com/watch?v=RM4UQBJGXCI

आणखी वाचा

गौतमी पाटीलला उचलायचं की नाही; चंद्रकांत पाटलांचा थेट DCP ला फोन, म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.