‘रिलेशनमध्ये असूनही बंबल वापरायचा, दारूसह अनेक वाईट सवयी’, मुंबईतील डॉक्टरने शेवटच्या चिठ्ठीत स
मुंबई: मुंबईतील अँटॉप हिल परिसरामध्ये ८ मार्च रोजी डॉक्टर तरुणीने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने जवळपास सहा पानांची सुसाईड (mumbai Crime News) नोट लिहिली आहे. या नोटमध्ये तिने तिची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा मांडली आहे. तिने आपला प्रियकर फजल मोहम्मद खान (31) वरती अनेक आरोप केले आहे. या नोटमध्ये तिने दोघांच्या (mumbai Crime News) पहिल्या भेटीपासून ते त्यांच्या प्रेमाची सुरुवात कधी आणि कशी झाली, इथंपासून ते आयुष्याचा शेवट करण्यापर्यंत प्रकरण कसं गेलं, तो तिला काय बोलायचा, कसा वागायचा, याची सगळी माहिती स्तुतीने चिठ्ठीत लिहिली आहे.(mumbai Crime News)
डॉ. स्तुती सोनवणे हिनं प्रियकर फैजुलला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत अनेक आठवणी लिहिल्या आहेत. तू मला खूप अपमानित केलंस. मी इतकी वाईट आहे का? तुझे शब्द इतके तीव्र होते की ते माझं आयुष्य संपवण्यासाठी पुरेसे ठरले. मी पूर्णपणे सुन्न झाले आहे. मला काहीच समजत नाहीये.मला आशा आहे की तू आनंदी असशील आणि तुझा नाजूक पुरुष अहंकार आता समाधानी झाला असेल. मी आयुष्यात कधी इतकी खालच्या पातळीवर वाटले नव्हते. यापेक्षा वाईट काय होऊ शकतं?सगळं असूनही मला स्वतःवर हसू येतंय, कारण मला अजूनही तुझ्यासोबत राहायचं होतं. तुझे शब्द माझ्या डोक्यात सतत घुमत आहेत. तू माझ्यावर ओरडलास. मला असं वाटलं की मी तुझ्यासमोर असते तर तू मला मारलंच असतंस किंवा खूप हिंसक झाला असतास. मला तुझी भीती वाटते. तू मला “हो” म्हणालास, तू म्हणालास की माझ्यावर खर्च केलेला वेळ आणि पैसे तुला वाया गेल्यासारखे वाटतात. खरं सांगायचं तर मला तुझ्यासोबत कधीच सुरक्षित वाटलं नाही, पण तरीही मी तुझ्यावर प्रेम केलं, असंही तिने आपल्या नोटमध्ये म्हटलं आहे.(mumbai Crime News)
रिलेशनशिपमध्ये असतानाही त्याने बंबल इंस्टॉल केलं
पुढे ती लिहते, तू म्हणालास की तुझ्या वडिलांनी माझ्याबद्दल जे म्हटलं ते बरोबर होतं – तरुण मुली चांगल्या नसतात. आपण रिलेशनशिपमध्ये असताना तुझ्याकडे बंबल अॅप होतं. तरीही मी तुला माफ केलं. कदाचित माझ्यात स्वाभिमानच नव्हता.आयुष्य खूप कठीण आहे. मी आणि फुजैल एक वर्षाहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होतो. त्याच्या अनेक वाईट सवयी होत्या – धूम्रपान, दारू पिणे. तरीही मी हे सगळं सहन केलं. कदाचित मी मूर्ख होते. आता तर आणखी मूर्ख आहे. पण मी त्याच्या प्रेमात पडले. माझ्या आयुष्यात एक संतुलन होतं. मी काम करत होते. सगळं ठीक चाललं होतं. पण रिलेशनशिपमध्ये असतानाही त्याने बंबल इंस्टॉल केलं. तरी मी दुर्लक्ष केलं.तो इतका वाईट असेल तर मला इतका त्रास का होतोय? कदाचित मी त्याला कधी भेटायलाच नको होतं.मला काय करावं कळत नाहीये. मला वाक्यही नीट लिहिता येत नाहीत. मला सगळं संपवायचं आहे असं वाटतंय.माझ्यासोबत असं वागण्याइतकं मी काही चुकीचं केलं होतं असं मला वाटत नाही. त्याने माझी स्कूटी तोडून टाकण्याची धमकी दिली. तो माझ्यावर ओरडला. त्याला वाटतं तोच एक चांगला माणूस आहे, पण ते खरं नाही.खरं तर तो सर्वात वाईट लोकांपैकी एक आहे.मी कदाचित मूर्ख आहे. पण मी स्वतःला थांबवू शकत नाही. सगळं आपल्या नियंत्रणात नसतं. मला खूप खूप दुःख होतंय, असंही तिने म्हटलंय.
कदाचित मी मूर्ख होते, आता तर आणखी मूर्ख..
तू म्हणालास की तुझ्या वडिलांनी माझ्याबद्दल जे म्हटलं ते बरोबर होतं. तरुण मुली चांगल्या नसतात. आपण रिलेशनशिपमध्ये असताना तुझ्याकडे बंबल होतं. तरीही मी तुला माफ केलं. कदाचित माझ्यात स्वाभीमान नव्हता, असंही तरुणीने नोटमध्ये म्हटलं आहे. मी आणि फैजुल एक वर्षाहून अधिक काळ रिलेशनमध्ये होतो, असंही तिने चिठ्ठीत म्हटलं. त्याच्या वाईट सवयींबद्दलही तरुणीने चिठ्ठीत सांगितलं आहे. त्याच्या अनेक वाईट सवयी होत्या. तो सिगरेट ओढायचा, दारु प्यायचा. तरीही मी सगळं सहन केलं. कदाचित मी मूर्ख होते, आता तर आणखी मूर्ख आहे. पण मी त्याच्या प्रेमात पडले, अशा शब्दात तिने आपल्या व्यथा मांडल्या आहेत. तिची ही नोट सध्या व्हायरल झाली असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.