बापाने 14 वर्षांच्या मुलीवर ब्लेडने वार केला, तिला गळ्याला मुंगी चावल्यासारखी वाटली अन् वेदना झ
मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वतःच्या १४ वर्षीय मुलीच्या वडिलांनी ती झोपेत असताना ब्लेडने गळा (Mumbai Crime News) चिरल्याची संतापजनक घटना सोमवारी उशिरा रात्री दहिसरमधील कोकणी पाडा येथे घडली आहे. यावेळी तिला वाचवायला गेलेल्या पत्नीवरही आरोपीने ब्लेडने हल्ला (Mumbai Crime News) केला. हनुमंत सोनवळ (वय ३६) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.(Mumbai Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीवर हल्ला करणारा हनुमंत सोनवळ याला दारूचे व्यसन असून तो पत्नी राजश्री हिच्या चरित्र्यावरती संशय घेऊन तिला मारहाण करतो. त्यामुळे तिने वांद्रे कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केली आहे. राजश्री ही नालासोपाऱ्यातील वकिलांकडे घटस्फोटाच्या केसची माहिती घेऊन घरी आल्यानंतर हनुमंतने इतका वेळ कुठे गेली होतीस, असे विचारत तिला त्रास दिला तसेच पत्नी आणि मुलीला मारण्याची धमकी (Mumbai Crime News) देत दिली. त्यानंतर त्यांच्यामध्ये काहीशी वादावादी झाली.(Mumbai Crime News)
Mumbai Crime News: गळ्याजवळ काहीतरी चावल्यासारखे वाटून तिला वेदना
मुलगी रात्री झोपत असताना रात्री सव्वादोनच्या सुमारास तिच्या गळ्याजवळ काहीतरी चावल्यासारखे वाटून तिला वेदना झाल्या. त्यावेळी तिला वडिलांनी आपला गळा चिरल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने आरडाओरड केला असता तिला वाचविण्यासाठी आलेल्या राजश्रीच्या पोटावरताहा ब्लेडने वार केला. या घटनेनंतर नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली, तर जखमी-मायलेकीना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघींवरती हल्ला करणाऱ्या हनुमंतला अटक करण्यात आली आहे.
तर पती दारूच्या आहारी गेल्याने पत्नीसोबत दररोज क्षुल्लक कारणांवरून वाद घालत होता. तसेच मद्यपी पती हा वारंवार पत्नीवर संशय घेत असून त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत. याच रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने अलीकडेच वकिलांना भेटून घटस्फोटाबाबत चौकशी केली होती. रविवारी पत्नी उशिरा घरी परतल्यावर संशयिताने पुन्हा वाद घातला. पत्नीने घर विकून पुण्याला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दीक वाद झाल्यानंतर पती घराबाहेर पडला. रविवारी रात्री उशिरा पत्नी-मुलगी झोपल्यानंतर काही तासांनंतर घरात येत आरोपी बापाने झोपलेल्या मुलीवर वार केले, नंतर पत्नीवरतीही वार केले. यात दोघी जखमी झाल्या असून दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.