मुंबईत एका पॉश सोसायटीत 27 वर्षीय मोलकरणीने उचललं टोकाचं पाऊल; पोलीस तपासात धक्कादायक कारण उघड


मुंबई: मुंबईतील पॉश सोसायटीत 27 वर्षीय मोलकरणीने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची (House Help end her life At Employers Flat In Mumbai) घटना समोर आली आहे. अँटॉप हिल येथील आशियाना सोसायटीमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय मोलकरणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. या मोलकरणीचे नाव च्योईसंग तमांग असे होते, तिच्यावरती चोरीचा संशय घेतल्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.(House Help end her life At Employers Flat In Mumbai)

Antop hill maid ends life:  2 वर्षांपासून तिथं करत होती काम

आशियाना सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दाम्पत्याच्या घरी च्योईसंग तमांग ही घरकामासाठी कार्यरत होती. मुळची दार्जिलिंग येथील असलेली तमांग गेली दोन वर्षे त्या कुटुंबाकडे काम करत होती आणि ती तिथेच वास्तव्यास होती. मंगळवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास ती घराच्या बाल्कनीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ आशियाना सोसायटीत पोहोचले. तमांग हिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

Antop hill maid ends life: च्योईसंग तमांग हिच्यावरती चोरीचा आरोप

तमांग ज्या घरात काम करत होती, तेथून काही दागिने चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दागिन्यांच्या चोरीत तमांगचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या संशयामुळे ती मानसिक तणावाखाली होती, आणि त्याच कारणातून तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची चर्चा आशियाना सोसायटी परिसरात सुरू आहे.या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून, तमांगच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवले जात आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नाही, मात्र घटनेचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Antop hill maid ends life: सुमारे 10 लाखांचे दागिने गायब

प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, तमांग ज्या घरात काम करत होती, त्या घरातून सुमारे 10 लाख रुपयांचे दागिने चोरी झाल्याचे उघड झाले आहे. या चोरीप्रकरणी तमांगवर संशय व्यक्त करण्यात आला होता. या आरोपांमुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती, आणि त्याच दबावातून तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तमांग गेल्या दोन वर्षांपासून एका 70 वर्षीय वृद्ध दाम्पत्याच्या घरी काम करत होती आणि तिथेच वास्तव्यास होती. त्यामुळेच दाम्पत्याने दागिने चोरीप्रकरणी तिच्यावर संशय घेतल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, नेमक्या कोणत्या परिस्थितीत आत्महत्येची वेळ आली आणि दागिन्यांच्या चोरीमागील सत्य काय आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.