‘मी त्यांना नकोय, माझा त्रास कधीच थांबणार नाही’; मुंबईत म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीने आयुष्य

मुंबई मगा ऑफिसर पत्नी सुसाइड: पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्यामुळे मुंबईतील म्हाडा प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या (Mumbai news) पश्चिम उपनगरातील आकुर्ली परिसरात ही घटना घडली. म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नी रेणू कटरे (वय 44) यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली. रेणू कटरे या पेशाने शिक्षिका होत्या. हुंड्याच्या कारणामुळे सासरच्या मंडळींकडून त्यांचा छळ होत असल्याने रेणू कटरे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. (Crime News)

रेणू कटरे या आपल्या पतीसह कांदिवली परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहत होत्या. रेणू कटरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अनेकदा आपल्या भावाला सासरी होणाऱ्या त्रासाविषयी सांगितले होते. ‘माझा त्रास कधीच थांबणार नाही. मी त्यांना नको आहे’, असे रेणू यांनी आपल्या भावाला सांगितले होते. ‘मी उच्चपदस्थ अधिकारी आहे. तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही’, असे बोलून बापू कटरे यांनी पत्नीला अनेकदा हिणवले होते. रेणू कटरे यांची सासूदेखील कमी हुंडा दिल्यामुळे त्यांना सतत टोमणे मारायची. रेणू कटरे यांच्याकडे माहेरच्यांकडून पैसे आणण्यासाठी सतत तगादा लावला जायचा. त्यामुळे लग्न झाल्यानंतर रेणू कटरे यांच्या वडिलांनी 8 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या रेणू यांना दिल्या होत्या. तसेच 2023 साली 12 लाख आणि 2024 साली 10 लाख रुपये रेणू यांच्या सासरच्या मंडळींना दिले होते. मात्र, यानंतरही रेणू कटरे यांचा मानसिक छळ सुरु होता. त्यांना काठीने मारहाण केली जात होती, असा आरोप रेणू कटरे यांच्या भावाने केला आहे.

या सगळ्या वादामुळे रेणू कटरे आणि बापू कटरे यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी 27 जुलै रोजी बैठक घेण्याचे ठरवले होते. मात्र, ऐनवेळी बापू कटरे यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. त्यामळे रेणू कटरे यांची मानसिक अवस्था प्रचंड बिघडली होती. 26 जुलैला रेणू यांनी आपल्या भावाला फोन केला. त्यावेळी पती विनाकारण मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचे रेणू यांनी सांगितले. वाद मिटवण्यासाठीच्या बैठकीला येण्यासही त्यांनी नकार दिला. माझा हा त्रास थांबणार नाही, असे म्हणत रेणू यांनी फोन ठेवून दिला होता. याशिवाय, रेणू यांच्यावर एका डॉक्टकरडे उपचार सुरु होते. त्यालाही रेणू कटरे यांनी फोन केला होता. ‘पतीने फसवले, तो मिटींग टाळत आहे. मी त्यांना नको आहे’, एवढे बोलून रेणू यांनी फोन कट केला. डॉक्टरांनी पुन्हा कॉल केला तेव्हा रेणू यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी बापू कटरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा रेणूने स्वत:ला फ्लॅटमध्ये कोंडून घेतल्याचे बापू कटरे यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांकडून समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून रेणू कटरे यांचे पती बापू कटरे यांना अटक करण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=byprcaxwol8

आणखी वाचा

कारमध्ये बसवलं, हात मागे बांधून विवस्त्रं केलं अन् पहाटेपर्यंत तरुणीवर अत्याचार, लोणावळ्यात नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.