टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसा

मुंबई क्राईम न्यूज मुंबई : मुंबईतील साकीनाका आणि पवई पोलिसांनी एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त (Mumbai Crime News) केलं आहे. टिंडर डेटींग अॅपवर मुली पुरषांना जाळ्यात ओढायच्या आणि घाटकोरपच्या साकीनाका येथील कॅफे क्लबमध्ये त्यांना घेऊन जात होत्या. कॅफेमध्ये जाऊन या तरुणी पुरुषांना धमकावून नको नको ते प्रकार करायच्या. याच कॅफे क्लबवर पोलिसांनी छापा टाकला आणि सदर प्रकरणी 10 जणांना अटक केली.

नेमकं प्रकरण काय? (Mumbai Crime News)

टिंडर डेटींग ॲपवर मुली काही श्रीमंत तरुणांना लक्ष करायच्या, त्यांना तिथे लाइक देत डेटिंगला बोलवायच्या. यानंतर घाटकोरपच्या साकीनाका येथील कॅफे क्लबमध्ये पुरुषांना या तरुणी घेऊन जायच्या. दिल्लीहून मुंबईत 25 ते 30 मुली आणण्यात आल्या होत्या. कॅफे क्लबमध्ये भेट झाल्यावर मुली तरुणांना तुझ्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रार करणार, पोलिसांत जाणार अशा धमकी द्यायच्या.

कॅफे मालक स्वतः रॅकेटमध्ये सहभागी- (Mumbai Crime News)

अनेकदा मुली कुणतीतरी ऑर्डर करत त्याचे अव्वाच्या सव्वा बिल व्हायचे. मिळालेल्या माहितीनूसार, 25 ते 50 हजारच्या पुढेच बिल व्हायचे. यात कॅफे मालक स्वतः रॅकेटमध्ये सहभागी असून एकूण 10 जणांना याप्रकाणी पवई पोलिसांनी सापळा रचत अटक केली. अटक केलेल्या दहा जणांमध्ये तीन मुलींचाही समावेश आहे. सदर तरुणींना खास या रॅकेटसाठी दिल्लीहून आणण्यात आले होते.

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर- (Mumbai Crime News)

पोलिसांनी जेव्हा कॅफेमध्ये छापा टाकला तेव्हा एका पीडित तरुणाला खाली बसवत त्याच्यावर बाऊंसर्सकडून धाक दाखवत पैसे वसुली सुरू होती. याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

मुंबईतील आणखी एक धक्कादायक घटना- (Mumbai Crime News)

काळी जादू केल्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने व्हिडीओ कॉलवक मुलाला आईचा मृतदहे दाखवला. मुंबईतील धारावीमध्ये ही घटना घडली. मुलगा शिवराम सोलंकी (33) मुलुंडमधून आई-वडिलांच्या घरी आला. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने मुलाने वडिलांना फोन केला. अमृत सोलंकी यांनी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर मुलाला आईचा मृतदेह दाखवला. आरोपीने सांगितले की, त्याने पत्नीचा गळा दाबून हत्या केली आणि बाटलीनेही वार केला. पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस घटनास्थळी धावून गेले, दरवाजा तोडून सूरजबेन यांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपी अमृत सोलंकी याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, चित्रपटाप्रमाणं बनाव रचला, अखेर पोलिसांनी सत्य समोर आणले, तिघांना अटक

आणखी वाचा

Comments are closed.