शेअर मार्केटमधून पैसे दुप्पट करुन देण्याचे अमिष, लाखो रुपयांची फसवणूक, मुंबई पोलिसांची कारवाई


मुंबई क्राईम न्यूज : शेअर मार्केटमध्ये (Stock Market) पैसे दुप्पट करुन देण्याचे अमिष दाखवून मोठ्या संख्येमध्ये नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींना पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

आरोपी वेगवेगळ्या नावाने बोगस बँक खाती उघडून त्याद्वारे फसवणूक करत असल्याचे उघड

मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी शेअर मार्केटमध्ये पैसा दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून मुंबईकरांची लूट करणारी टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा परिसरात राहणारा एका व्यक्तीला ट्रेडिंग च्या नावाने 5 लाख 72 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. फिर्यादी राजू छिब्बेर यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, पैसा डबल करून देतो असे सांगून रक्कम उकळली होती. तांत्रिक तपासात संशयितांचे लोकेशन धारावी परिसरात आढळल्याने पोलिसांनी मोहम्मद अकील शेख याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या माहितीवरून विजयकुमार पटेल, राजेंद्र विधाते आणि अक्षय कणसे यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपी वेगवेगळ्या नावाने बोगस बँक खाती उघडून त्याद्वारे फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचा बहाना, भोंदूबाबाने केली 1 कोटी 87 लाखांची फसवणूक, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आणखी वाचा

Comments are closed.