पत्नीनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीला संपवलं; अमानुषपणे मारहाण केली अन् अर्धमेल्या अवस्थेत घरातच ठ
मुंबई: मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईमध्ये पत्नीने तिच्या प्रियकरासह (Mumbai Crime News) मिळून तिच्या पतीला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे, मृत पती हा व्यवसायाने चित्रपट मेकअप आर्टिस्ट आहे, ही हत्येची कहाणी एखाद्या क्राईम (Mumbai Crime News) थ्रिलरपेक्षा कमी नाही. यामध्ये एक निष्पाप मुलगी, एक असहाय्य आई आणि एक अविश्वासू पत्नी आहेत. मुंबईतील आरे कॉलनीतील छोटा काश्मीर गार्डन परिसर, येथे राहणारा 40 वर्षीय भरत अहिरे फिल्म सिटीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायचा. त्याची पत्नी राजश्री आणि तिचा प्रियकर चंद्रशेखर यांनी मिळून भरत अहिरे याचा जीव घेतला. (Mumbai Crime News)
राजश्रीने तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगा यांना फोन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलैच्या रात्री राजश्रीने तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगा यांना फोन केला आणि बोलावून घेतलं आणि पतीला मारण्याचा कट रचला. भरतची 12 वर्षांची मुलगी श्रेयाने पोलिसांना सांगितले की, आईने बाबांना शौचालयाजवळ बोलावले, जिथे तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगाने भरतला लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या पोटातील नस तुटली, छातीची हाडे तुटली आणि यकृताचे खूप नुकसान झाले, असंही त्यांनी म्हटलं आहे.(Mumbai Crime News)
पाच ऑपरेशन्सनंतरही तो वाचू शकला नाही
या घटनेनंतर निर्दयी पत्नी राजश्री अर्धमेल्या अवस्थेत भरतला धमकी देत राहिली की जर त्याने कोणाला सांगितले तर ती मुलांनाही मारून टाकेल. त्याला तीन दिवस घरात लपवून ठेवण्यात आले आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत. जेव्हा त्याची प्रकृती बिघडली तेव्हा 16 जुलै रोजी भरतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच ऑपरेशन्सनंतरही तो वाचू शकला नाही आणि 5 ऑगस्ट रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. आरे पोलिसांनी खून आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करून पत्नी राजश्री आणि आरोपी रंगाला अटक केली आहे, तर प्रियकर चंद्रशेखर अजूनही फरार आहे. या घटनेनं संताप व्यक्त होत आहे.(Mumbai Crime News)
प्रियकरासोबत रचला कट अन्…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत राहणाऱ्या राजश्री अहिरे (35) हिचा तिचा पती भरत लक्ष्मण अहिरे याच्याशी बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. राजश्री अहिरे यांचे चंद्रशेखर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. राजश्री आणि चंद्रशेखर यांनी भरतला संपवण्याचा कट रचला. 15 जुलैच्या रात्री चंद्रशेखरने भरतला गोरेगाव पूर्वेतील एका ठिकाणी बोलावले. दोघांनीही चंद्रशेखरच्या भावाच्या मदतीने भरतला मारहाण केली. तिच्या पतीला रुग्णालयात नेण्याऐवजी, पत्नी त्याला घरी घेऊन गेली. तिने त्याला तीन दिवस उपचाराशिवाय ठेवले. भरतची प्रकृती खालावत गेली, परंतु पत्नीने कोणतीही वैद्यकीय मदत घेतली नाही. अखेर भरतचा मृत्यू झाला.
पत्नीने सर्वांची दिशाभूल केली
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या दोन मुली आणि 3 वर्षांचा मुलगा महिलेच्या क्रूरतेचे साक्षीदार बनले. त्यांनी नातेवाईकांना वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली. नातेवाईक तिथे पोहोचले तेव्हा राजश्रीने सांगितले की भरत दुचाकी अपघातात जखमी झाला आहे, परंतु पोलिसांना राजश्रीच्या दाव्यावर शंका आली. पोलिसांनी मुलांशी याबाबत संवाद साधला तेव्हा सत्य बाहेर आले. भरतचा मृत्यू 5 ऑगस्ट रोजी झाला. पोलिसांनी राजश्रीला हत्येचा कट रचल्याच्या आणि जाणून बुजून तिच्या पतीला मरू दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा प्रियकर चंद्रशेखर अजूनही फरार आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.