खळबळजनक! पदपथावर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या; मुंबईतील चर्चगेट परिसरातील घटना
मुंबई गुन्हेगारीच्या बातम्या: दक्षिण मुंबईतील चर्चगेट परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या परिसरात असलेल्या मस्कटी कोर्ट इमारतीजवळील पदपथावर झोपलेल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड मारून हा खून (Crime News) केला असल्याचे समजतंय. ही घटना तक्रारदार हर्ष शहा (वय 31 वर्ष) या शेअर मार्केटच्या दलालाच्या लक्षात आली असता त्याने तातडीने याबाबतची माहिती स्थानिक मैदान पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या मदतीने सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या हत्येच्या घटनेने परिसरात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
प्रत्यक्षदर्शीने घडलेला प्रकार सांगितला
पुढे आलेल्या माहितीनुसार, चर्चगेट येथे उभी केलेली दुचाकी घेण्यासाठी तक्रारदार गेले. त्यावेळी डोक्यावर रूमाल बांधलेल्या, निळ्या टी-शर्ट आणि गडद रंगाच्या फुलपँट घातलेल्या एका व्यक्तीने पदपथावर झोपलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर मोठ्या दगडाने प्रहार करत असल्याचे दिसून आले. यावेळी आरोपी सारखा दगड उलून त्या व्यक्तीच्या डोक्यात मारत होता. त्यामुळे तक्रारदार घाबरले. त्यांनी लगेच चर्चगेट स्थानकाजवळ धाव घेतली. यावेळी उभ्या असलेल्या टॅक्सी चालकांना तक्रारदार यांनी घडलेला प्रकार सांगितला. तसेच त्यांच्याकडे मदत मागितली.
नंतर ईरॉस सिनेमा जवळील पोलीस मदत केंद्रात पोहोचले. तिथे पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगून त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. यानंतर तक्रारदार आणि पोलिसांनी परत घटनास्थळी पोहोचल्यावर झोपलेला व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळला. तर आरोपी आणि मृत दोघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. हत्या का करण्यात आली, याचे कारण ही अद्याप अस्पष्ट आहे. सध्या पोलिसांनी या घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.
मुलाचा मित्र असल्याचे सांगत वृद्ध महिलेला लुटलं, 4 तोळे सोने घेऊन पळाला
मुलाचा मित्र असल्याचे सांगून एका वृद्ध महिलेला लुटण्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगरमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे चोरट्याने महिलेचा विश्वास संपादन करून ‘तुमच्या मुलाचा चेक आला आहे, तो चेक लॅप्स होईल. त्याचे वाईट परिणाम होतात. तुम्ही मला तुमचे सोन्याचे मंगलसूत्र आणि बांगड्या काढून द्या. मी मेडिकलमधून वजन करून पावती आणून देतो.’ अशी थाप मारली आणि वृद्ध महिलेचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी सर्व दागिने काढून दिले. आणि चोरट्याने दागिने हाती लागतात त्या ठिकाणावरून धूम ठोकली. दरम्यान हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून 4 लाखांचे दागिने त्या चोरट्याने पळवले आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.