‘500 रुपयांत शरीरसंबंध’, तरुणीसोबत केला सौदा अन् फसला, मुंबईत तरूणासोबत ‘त्या’ रूममध्ये झालं भय
मुंबई: मुंबईच्या गिरगाव परिसरात एका तरुणाशी फसवणुकीची धक्कादायक (Mumbai Crime News) घटना घडली आहे. शारीरिक संबंधाच्या आमिषाला बळी पडून अनोळखी महिलेवर विश्वास ठेवताना त्याला तब्बल ३५ हजारांचा फटका बसला. आरोपी महिलेने गोड बोलून तरुणाला लॉजवर नेले(Mumbai Crime News) , जिथे तिच्यासह आणखी तीन महिलांनी मिळून त्याला धमकावत ब्लॅकमेल केले. बदनामीची भीती दाखवत चौघींनी मिळून त्याच्याकडून ३५ हजार रुपये जबरदस्तीने (Mumbai Crime News) वसूल केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (prostitution scam girgaon with youth)
Prostitution Scam: ५०० रुपयांत शरीरसंबंधाची डील ठरवली
मिळालेल्या माहितीनुसार, ५०० रुपयांत शारीरिक संबंधाचे आमिष दाखवून एका तरुणाला लुबाडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. तक्रारदार सीएसएमटी स्थानकात असताना, एका अनोळखी महिलेने त्याच्याशी संपर्क साधून ५०० रुपयांत शरीरसंबंधाची डील ठरवली. त्यानंतर तिने तक्रारदाराला टॅक्सीने पठे बापूराव मार्गावरील भारत भवन हॉटेलजवळील इमारतीत नेले. पहिल्या मजल्यावरील खोलीत गेल्यानंतर तिच्यासोबत आणखी तीन महिला खोलीत आल्या. चौघींनी मिळून तक्रारदाराला धमकावत बदनामीची भीती दाखवली. त्याच्या मोबाईलवरून २२ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले तसेच १३ हजार रुपये रोख रक्कमही हिसकावली. घटनेनंतर पीडित तरूणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपी महिलांचा शोध सुरू आहे.
Prostitution Scam: पोलिसांनी गुन्हा नोंदवत केली कारवाई
घटनेनंतर पीडित तरुणाने तात्काळ व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई केली आणि फसवणुकीत सामील असलेल्या तीन महिलांना अटक केली. अटक झालेल्या आरोपींची नावे माजिदा नूर सरदार गाझी, रुपा विश्वनाथ दास आणि नसिम्मा जमान शेख अशी आहेत. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Prostitution Scam:अश्लील व्हिडिओ शूट करून बदनामीची भीती
शारीरिक संबंधासाठी तयार झाल्यानंतर आरोपी महिलेनं तक्रारदाराला टॅक्सीमधून पठ्ठे बापूराव मार्गावरील भारत भवन हॉटेलशेजारील एका इमारतीत नेले. पहिल्या मजल्यावरील खोलीत पोहोचताच तिच्यासोबत आणखी तीन महिला आत आल्या आणि तक्रारदाराला धमकावले. त्याचे अश्लील व्हिडिओ शूट करून बदनामीची भीती दाखवली. त्यानंतर तक्रारदाराच्या मोबाईलमधून २२ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले, तसेच १३ हजार रुपये रोख काढून घेतले. या घटनेनंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपी महिलांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.