आमचं नातं शारीरिक संबंधांच्या पलीकडचं; मंबईतील 16 वर्षीय विद्यार्थ्यावर अत्याचार करणावरऱ्या 40
मुंबई : मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षकेला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली (Mumbai Crime News) अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याचे अनेक वेळा लैंगिक शोषण केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय, ती त्याला दारू पाजायची आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची तिथे ती त्याचे शोषण करायची, अशी माहिती देखील तपासात समोर आली आहे. त्याचबरोबर या शिक्षिकेने शाळेत राजीनामा दिला की तिला राजीनामा देण्यास भाग पाडलं, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, शाळेला या अत्याचाराबद्दल आधीपासून काही माहिती होती का, हे देखील पोलीस तपासत आहेत. जानेवारी 2024 मध्ये अत्याचारांना सुरुवात झाल्याचा आरोप आहे, तर शिक्षिकेने एप्रिलमध्ये राजीनामा दिला, असे म्हटले जात आहे. गेल्या शनिवारी जेव्हा शिक्षिकेला अटक झाली, तेव्हाच आम्हाला याबद्दल माहिती झाली, असा दावा या नामांकित शाळेच्या प्रशासनाने केला आहे.(Mumbai Crime News)
पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी शिक्षिकेची गुरुवारी मानसशास्त्रीय चाचणी केली. गुन्हा करण्याच्या वेळी ती मानसिकदृष्ट्या ठीक होती की नाही, हे तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात आली. पोलिसांनी शिक्षिकेला गुरुवारी POCSO कोर्टात हजर केले. न्यायालयाने तिला 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.(Mumbai Crime News)
नेमकं काय आहे प्रकरण?
आरोपी असलेली 40 वर्षीय शिक्षिका ही विवाहित आहे, तिला मुल देखील आहे. डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी डान्स बसवत असताना ती संबंधित विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये तिने त्याला पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी मागणी घातली, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी शिक्षिकेच्या एका मैत्रिणीवरही गुन्हा दाखल केला आहे. ही मैत्रीण मुलाच्या आणि शिक्षिका यांच्यामध्ये संपर्क साधण्यास मध्यस्थी करत असल्याचा आरोप तिच्यावरती आहे. जेव्हा मुलगा शिक्षिकेपासून दूर राहू लागला, तेव्हा या मैत्रिणीने त्याच्याशी संपर्क साधून दिला. ही मैत्रीण डॉक्टर असल्याची माहिती आहे. शिक्षिकेने त्या अल्पवयीन मुलासोबत शारिरीक संबंध ठेवल्यानंतर या मैत्रिणीने मुलाला अँक्झायटी कमी करणारी औषधे दिली होती. शिक्षिका मुलाला पंचतारांकित हॉटेल्समध्ये घेऊन जायची, त्याला दारू पाजायची आणि नंतर लैंगिक अत्याचार करायची, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचबरोबर हा मुलगा त्या डॉक्टर मैत्रिणीच्या संपर्कात असल्याचं देखील बोललं जात आहे.
पोलिसांनी शाळेतील इतर सहकाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे. शिक्षिकेची नियुक्ती, राजीनामा आणि मुलाचा शाळेतील प्रवेश यासंबंधी कागदपत्रे जमा करत आहेत. शिक्षिका 2021 मध्ये शाळेत रुजू झाली, तेव्हा कोरोनामुळे शाळा ऑनलाइन होती, असे पोलिसांनी सांगितले. या शाळेत येण्यापूर्वी ती मुंबईतील दुसऱ्या मोठ्या शाळेत शिकवत होती, असे एका शिक्षकाने सांगितले. आरोपी शिक्षिकेने एप्रिल 2024 मध्ये राजीनामा दिला होता. शिक्षिकेच्या नवऱ्याचा जबाबही नोंदवला जाणार आहे. शिक्षिकेची मानसिक चाचणी सकारात्मक आली आहे. याचा अर्थ ती मानसिकदृष्ट्या ठीक असल्याचं त्यातून निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी तिला लैंगिक अत्याचाराबद्दल विचारलं असतान, तिने सांगितले की, “आमचं नातं शारीरिक संबंधांपेक्षा खूप पुढे होतं.” आजही तिच्या मनात त्या मुलाबद्दल भावना आहेत, असंही तिने पोलिसांना सांगितलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.