‘…नाहीतर तुला नापास करेन’, मुंबईत नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, शेवटच्या बेंचवर ब

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, कांदिवली पूर्व परिसरामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा वारंवार लैंगिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला दहावीच्या परीक्षेमध्ये नापास करण्याची धमकी देत, तिच्यासोबत वारंवार अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्व घडत होतं, आणि ती पीडित मुलगी आरोपीचा छळ निमूटपणे सहन करत होती. पण पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबाबत समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप पांडे असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे, या प्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे, तो कांदिवली पूर्वमधील हनुमान नगर येथील पाल राजेंद्र इंग्लिश हायस्कूलमध्ये गणित विषयाचा शिक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी आरोपी शिक्षक कुलदीप पांडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपी ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी शिक्षक कुलदीप पांडे हा त्या शाळेत गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून गणित हा विषय शिकवतो. पीडित मुलगी वय (१५) ही दहावीच्या वर्गामध्ये असून ती शेवटच्या बेंचवर बसायची. कुलदीप पांडे वारंवार या मुलीकडे जाऊन तिला स्पर्श करायचा, तुला शकवलेलं काही समजलं की नाही, असं विचारतायचा. समजले नाही तर मला परत विचार, मी तुला सांगेन, असे म्हणून तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. तिने या शिक्षकाला विरोध करूनही हा प्रकार सुरूच होता.

तुला दहावीत नापास करेन अशी धमकी

जुलै महिन्यापासून या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीला अश्लील घाणेरडे मेसेज पाठवणे सुरू केले. रात्री फोन करून रात्रीच्या वेळी भेटायला बोलवत असे. तू आली नाहीस, तर तुला दहावीमध्ये नापास करून टाकीन, असे धमकावत असे. दोन-चार दिवसाअगोदर या मुलीला भेटून तू कोणाला काही सांगितलं तर मी मारून टाकेन, अशी धमकी देखील त्याने दिली होती.

नोकरी गेली तरी नराधमाने त्रास सुरूच ठेवला

मुलगी या संपूर्ण प्रकरणामुळे दडपणाखाली आली होती, आणि घाबरल्यासारखी दिसत होती, तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले आणि मुलीने सर्व हकिगत सांगितली. संतापलेल्या आईने शाळेत जाऊन आरोपी शिक्षक पांडेला दोन चापटा मारल्या. यानंतर शाळेनेही त्याच्याकडून लेखी जबाब घेऊन त्याला नोकरीवरून काढून टाकलं. तरीही आरोपी शिक्षकाने मुलीचा छळ सुरूच ठेवला. पीडित मुलीच्या आईने समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी कुलदीप पांडे याने अनेक विद्यार्थिनींचा असाच लैंगिक छळ केला असावा, असा संशय आहे, दरम्यान या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.