मुंबई पुन्हा एकदा हादरली, अंधेरीत मुलानेच वडील अन् आजोबांना संपवलं; नेमकं काय घडलं?


मुंबई क्राइम न्यूज मुंबई: मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत तक्षशिला परिसरात डबल मर्डर झाल्याची घटना (Mumbai Crime News) घडली आहे. 23 वर्षांचा मुलाने आपल्या वडिलांना आणि आजोबाची चाकूने हत्या केली. वडील आणि आजोबा दारू पिऊन सातत्याने शिवीगाळ आणि धिंगाणा घालत असल्यामुळे मुलाने मध्यरात्री दोघांची हत्या केली.

नेमकं काय घडलं? (Double Murder In Mumbai)

रात्री दारू पिऊन वडील पैसे आणि शिवीगाळ करत होते. तेव्हा मुलाने 52 वर्षीय वडिलांचा हत्या केली. याचवेळी 75 वर्षीय आजोबा आणि 45 वर्षीय काका भांडण सोडवायला गेले. त्यांच्यावरही मुलांनी चाकूने हल्ला केला. मुलाचा या हल्ल्यात काकासुद्धा गंभीर जखमी झाले असून  त्यांच्यावर जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहे. रात्री दोनच्या सुमारास मुलाचे वडील आणि आजोबा दारू पिऊन धिंगाणा घालत होते. याच्याच राग धरून मुलाने धारदार चाकूने दोघांना संपवलं. हत्या करून मुलगा एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये चाकू घेऊन आत्मसमर्पण केले. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह  शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवले. तर हत्या करणारा मुलाच्या विरोधात एमआयडीसी पोलीस हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

ही बातमीही वाचा:

संतापजनक! इंस्टावर मैत्री करुन संबंध ठेवले; व्हिडिओ बनवून 7 जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

आणखी वाचा

Comments are closed.