वृद्ध आजीची काळजी घेणाऱ्या मदतनीस महिलेनेच केली चोरी, तब्बल साडेतीन कोटींच्या दागिन्यांवर डल्ला
मुंबई क्राईम न्यूज : आरोपी कितीही चलाख असला तरी गुन्हा करताना तो काही चुका करतोच आणि याच चुका अखेर त्याला पोलीस कोठडीत पोहोचवण्यास पुरेसा ठरतात, असाच काहीसा प्रकार मरीन ड्राईव्ह परिसरात एकट्या राहणाऱ्या 93 वर्षीय महिलेच्या घरी घडला आहे. महिलेची काळजी घेणाऱ्या मदतनीस महिलेने रान मोकळ बघून घरातील तब्बल साडेतीन कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. अर्चना साळवी असं या चोरी करणाऱ्या महिलेचं नाव आहे. चोरी मे महिन्यात झाली होती, त्यानंतर डिसेंबर महिन्यात अचानक अर्चना साळवीच्या कोळसेवाडी कल्याण येथील घराच दार वाजलं आणि बाहेर उभे होते मरीन ड्राईव्ह पोलीस. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय?
93 वर्षीय या महिलेचा मुलगा हिरे व्यावसायिक असून तो दुबईला असायचा, कधी तो तर कधी त्याची पत्नी महिन्या दोन महिन्यात मुंबईत येत जात असायचे. आपल्या वयोवृद्ध आईची काळजी घेण्यासाठी त्याने चार नोकर ठेवले होते. दरम्यान, 26 जुलैला मरीन ड्राईव्ह येथील आपल्या घरी चोरी झाल्याचे मुलाल समजले. कपाटात ठेवलेले साडे तीन कोटींचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरी झाल्याचे त्याला समजलं. हे पाहून मुलाला अचानक धक्का बसला होता.
बाथरुममध्ये लपवून ठेवलेल्या दांगिन्यांचीही चोरी
आपली आई 93 वर्षांची असून एकटी असते यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तिच्या मुलाने बाथरूममध्ये कपाट बनवून त्यातील तिजोरीत दागिने ठेवले होते. तिजोरी देखील कोणाला सापडणार नाही अशी बंदिस्त कपाटात ठेवण्यात आली होती. मात्र मुलाची पत्नी मुंबईत असताना घरी पर्यायी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या अर्चना साळवीला याची कुणकुण लागली होती. मुलाच्या पत्नीला मोठ्याने बोलण्याची सवय होती. एकदा फोनवर बोलता बोलता तिने कपाटातील दागिन्यांचा उल्लेख केला होता. बरोबर तो अर्चनाने ऐकला आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संधी मिळताच तीने दागिन्यांवर डल्ला मारला.
चोरी झाली मे महिन्यात पत्ता लागला जुलैमध्ये
26 जुलैला साडे तीन कोटींच्या दागिन्यांची चोरी झाल्याचं समजताच मरीन ड्राईव्ह पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. सुरुवातीला घरातील चार नोकरच मुख्य संशयित होते. पोलिसांनी चौघांना आणले त्यांची कसून चौकशी केली पण काही हाती लागलं नाही.
मोबाईल सीडीआरमधून लागला पहिला सुगावा
मे महिन्यात फक्त काही दिवस पर्यायी मदतनीस म्हणून काम केलेली अर्चना कधी पोलिसांच्या संशयाच्या घेऱ्यात देखील नव्हती. या सगळ्यांच्या मोबाईल कॉल डेटा रेकॉर्डची (सीडीआर) तपासणी केली असता चौघे अर्चना नावाच्या महिलेशी बोलत असल्याचं समोर आले. जेव्हा अर्चना या प्रकरणाची सातत्याने चौकशी करत असल्याचं समजल्यावर मात्र पोलिसांचा संशय बळावला, मात्र अर्चनाने मे महिन्यात केवळ काही दिवसच काम केल्याने अटक करायची तरी कोणत्या आधारावर हा पोलिसांसमोर प्रश्न होता. पोलिसांनी अर्चनाच्या घरावरच 24 तास पहार बसवला तेव्हा सामोर आल की काही महिन्यांपासून अर्चनाने मदतनीस म्हणून काम सोडल्याच समोर आल. पोलिसांनी बँक खात्यांची तपासणी केली असता तिच्या आणि तिच्या मुलाच्या खात्यात प्रत्येकी 25 लाख रुपयांच कॅश डिपॉजिट झाल्याच उघड झालं. अर्चनला अटक करण्यासाठी एवढे पुरावे पुरेसे होते
चोरी झालेल्या 1437 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांपैकी 1249 ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत
चौकशीत दागिने चोरी केल्याची कबुली तिने दिली आणि काही दागिने विकल्याची तर काही दागिन्यांचा बदल्यात दागिने बदलवून घेतल्याची माहिती तिने दिली. दागिने विकण्यात आलेल्या सगळ्या सोनसांकडून पोलिसांनी विकलेले आणि बदललेले असे दोन्ही दागिने जप्त केले आहेत. चोरी झालेल्या 1437 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांपैकी 1249 ग्रॅम वजनाचे दागिने आम्ही हस्तगत केले असून लवकरच उर्वरित दागिने जप्त केले जातील, अशी माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागूल यांनी दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.