गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी मागितली 3 लाखांची लाच, ACB ची मोठी कारवाई
मुंबई क्राईम न्यूज : मुंबईच्या मालाड परिसरात कुरार पोलीस स्टेशनमध्ये एसीबीनं (ACB) मोठी कारवाई केली आहे. कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडेसह एका पीएसआयला (PSI) लाच घेताना अँटी करप्शनच्या रंगेहात अटक केली आहे. फिर्यादी वकील यांचा गुन्हा नोंद करण्यासाठी पीएसआय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तावडे यांनी 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये गुन्हा दाखल करताना पोलीस अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांची लाच घेतली होती. मात्र, उर्वरित एक लाखाची रक्कम आज घेताना एसीबीच्या टीमने रंगेहात अटक केली आहे.
मुंबईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे. मलाडमध्ये कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडेसह एका पीएसआयला अटक केली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. फिर्यादीकडून यापूर्वी दोन लाख रुपये घेतले होते. उर्वरित 1 लाख रुपयांची लाच घेताना आज एसीबीने दोघांना रंगेहात पकडले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nandurbar Bribe : 8 लाखांची लाच घेताना PWD उपअभियंता रंगेहात अटक; ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी मागितले पैसे
आणखी वाचा
Comments are closed.