दुसऱ्या महिलेशी चॅटिंग सापडताच अनंत गर्जेंनी स्वत:च्या हातावर वार केले, गौरीला म्हणाले, ‘मी मरे
मुंबई क्राईम न्यूज भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी गुरुवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे (Anant Garje) यांचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. यामुळे अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांच्यात अनेकदा भांडणं व्हायची. या सगळ्यामुळे केईएम रुग्णालयातील दंतवैद्यक विभागात डॉक्टर असलेल्या गौरी गर्जे (Gauri Garje) प्रचंड तणावात होत्या. याच तणावातून गौरी गर्जे यांनी आत्महत्या (Suicide news) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गौरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे पीए अनंत गर्जे हे फरार असल्याची माहिती आहे. वरळी पोलिसांनी याप्रकरणी चौकशीला सुरुवात असली तरी अद्याप अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
या सगळ्या प्रकारानंतर गौरी गर्जे यांच्या मामांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, दोन महिन्यांपासून गौरी आणि तिच्या नवऱ्याचा वाद सुरु होता. गौरीला आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. मात्र, तिने त्याला माफ केले होते. मात्र, तरीही अनंत गर्जे यांनी त्या महिलेशी चॅटिंग सुरु ठेवले होते. अनंत गर्जे गौरीला खूप टॉर्चर करत होता. यावरुन दोघांमध्ये भांडण झाले तेव्हा, अनंत गर्जे यांनी स्वत:च्या हातावर वार केले आणि म्हणाला, मी पण मरेन आणि तुला पण गुंतवेन. गौरी डॉक्टर होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या करणार नाही, असे गौरी गर्जे पालवे यांच्या मामांनी सांगितले.
गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह झाला होता. त्यावेळी गौरीच्या घरच्यांनी लग्नासाठी 50 ते 60 लाख रुपये खर्च केला होता. बीडमध्ये (Beed news) हे लग्न झाले होते. त्यावेळी पंकजा मुंडेही या लग्नाला आल्या होत्या. लग्नानंतर गौरी यांना नवऱ्याच्या अनैतिक संबंधांविषयी समजले. तिने ही गोष्ट घरच्यांना सांगितली. पण नातेवाईकांना काय म्हणायचं, असं सांगत गौरी यांच्या आई-वडिलांनी पुढे काही करण्यात टाळाटाळ केली. गौरीच्या वडिलांकडे अनंत गर्जे यांच्या आणि दुसर्या महिलेल्या चॅटिंगचे पुरावे आहेत. गौरीने गळफास घेतला, माझ्यासमोर आत्महत्या केली, असे अनंत गर्जे यांनी पोलिसांना सांगितले. मग त्यांनी तिला आत्महत्या करताना थांबवले नाही का? गौरीने आत्महत्या केली तर मग अनंत गर्जे का पळाले, असा सवालही गौरी पालवे हिच्या मामांनी उपस्थित केला. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या डॉक्टर पत्नीने टोकाचं पाऊल उचललं, मुंबईत जीवन संपवलं
आणखी वाचा
Comments are closed.