वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआयच्या स्टोअरमधून खेळाडूंच्या जर्सी चोरीला; पोलिसांत तक्रार दाखल, ने

मुंबईचा गुन्हा वानखेडे स्टेडियम मुंबई: मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियममधील (Wankhede Stadium) बीसीसीआयच्या (BCCI) अधिकृत मर्चंडाईज स्टोअरमधून सुमारे 6.52 लाख रुपयांच्या 261 आयपीएल (IPL) जर्सी चोरीला गेल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका सुरक्षा व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी 13 जून 2025 रोजी झाली होती, परंतु त्याची अधिकृत तक्रार 17 जुलै रोजी दाखल करण्यात आली होती. ही तक्रार बीसीसीआयचे कर्मचारी हेमांग भरत कुमार अमीन यांनी दाखल केली आहे, जो माहीम येथे राहतो आणि वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआय कार्यालयात काम करतो.

नेमकं काय घडलं, तक्रारीत काय?

अमीन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी फारुख असलम खान, जो मीरा रोड पूर्वेतील गौरव एक्सलन्सीचा रहिवासी आहे आणि सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम करतो, त्याने परवानगीशिवाय स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टोअरमध्ये प्रवेश केला आणि चोरी केली.

आयपीएल संघातील प्रमुख खेळाडूंच्या जर्सींचा समावेश-

चोरी झालेल्या जर्सींमध्ये दिल्ली कॅपिटल्स (डीसी), मुंबई इंडियन्स (एमआय), लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी), सनरायझर्स हैदराबाद (एसएलआर), कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर), पंजाब किंग्ज (पीबीकेएस), गुजरात टायटन्स (जीटी), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी), राजस्थान रॉयल्स (आरआर) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यासारख्या प्रमुख आयपीएल संघांच्या खेळाडूंच्या जर्सींचा समावेश आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल-

पोलिसांनी आरोपी फारुख असलम खानविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे. पोलीस सध्या स्टेडियममधील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने चोरीशी संबंध जोडण्याचा आणि जर्सी जप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Ind vs Eng Oval Test Match : गिल अन् गंभीरचं सर्व काही पणाला, पाचवी कसोटी जिंकण्यासाठी घेणार मोठा निर्णय; 4 खेळाडू बाहेर, जाणून प्लेइंग-11

आणखी वाचा

Comments are closed.