मुंबईसाठी शार्दुल ठाकूर ठरला ‘किंगमेकर’; दोन्ही डावात विकेटचा ‘चौकार’, मेघालयावर दणदणीत विजय

मुंबई विरुद्ध मेघालय रणजी करंडक 2025: रणजी ट्रॉफी 2024-25 च्या एलिट ग्रुप अ सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट संघाने मेघालयचा एक डाव आणि 456 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) दोन्ही डावात चार विकेट्स घेतल्या. त्याने फलंदाजीने 84 धावाही केल्या. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या पराभवानंतर, मुंबईसाठी बोनस गुणांसह विजय मिळवणे महत्त्वाचे होते. मुंबईच्या या बोनस विजयामुळे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या आपल्या संधी जिवंत ठेवल्या.

शरद पवार क्रिकेट स्टेडियम अकादमी बीकेसी मुंबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर मेघालय संघ 86 धावांवर ऑलआऊट झाला. मेघालयकडून प्रिंगसांगने 19, आकाश कुमारने 16, अनिश चरकने 17 आणि हिमानने 28 धावा केल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने हॅट्रिलसह चार विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूरने 4 विकेट्स घेत मेघालयचा संघ लवकर संपुष्टात आणला. त्याच्याशिवाय मोहित अवस्थीने 3, शम्स मुलानीने 1 आणि डिसूझाने 2 विकेट घेतल्या.

मुंबईने पहिल्या डावात 617 धावांचा मोठा स्कोअर केला. मुंबईकडून सिद्धेश लाडने 145, आकाश आनंदने 103 आणि शम्स मुलानीने नाबाद 100 धावा केल्या. मुंबईकडून तीन फलंदाजांनी शतके ठोकले. त्याच्याशिवाय भारतीय संघाबाहेर असलेल्या शार्दुल ठाकूरनेही (Shardul Thakur) 84 धावांची शानदार खेळी केली. तर अजिंक्य रहाणे 96 धावांवर बाद झाला. तो त्याचे शतक झळकावण्यास हुकला. मेघालयकडून हिमानने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याशिवाय अनिश चरकने 2 विकेट घेतल्या.

मेघालयचा दुसरा डाव 129 धावांवर ऑलआऊट

मुंबई संघाने पहिल्या डावात 585 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर मेघालय दुसऱ्या डावात फक्त 129 धावा करू शकला. दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरनेही (Shardul Thakur) 4 विकेट्स घेतल्या. मेघालयकडून किशनने 39 धावा केल्या. अनिरुद्धने 24, सुमित कुमारने 13, जसकीरतने 15 आणि प्रिंगसांगने 15 धावा केल्या. मुंबईकडून गोलंदाजी करताना शार्दुलच्या 4 विकेट्स व्यतिरिक्त तनुश कोटियनने 4 विकेट्स घेतल्या. तर शम्स मुलानीने 1 विकेट घेतली.

हे ही वाचा –

Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्… मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video

अधिक पाहा..

Comments are closed.