दादर कबुतरखान्यावरील कारवाईला देवेंद्र फडणवीसांची स्थगिती, सरकार जैन समाजाच्या दबावापुढे नमल्या

दादर काबूटर खाना: मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील कबुतरखाने बंद करण्याच्या दिलेल्या आदेशाला मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंशत: स्थगिती दिली. मुंबईतील कबुतरखाने (Kabutar Khana Mumbai) अचानक बंद करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तुर्तास कबुतरांना नियंत्रित स्वरुपात खाद्य पुरवत राहावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) मुंबई महानगरपालिकेला दिले होते. यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) टीकेची झोड उठवली आहे. सरकारने जैन समाजाच्या (Jain Community) दबावापुढे नमते घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. भाजप राजकीय फायद्यासाठी जैन समाजाला खूश करत असल्याची टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज झाला होता. याविरोधात जैन समाजाने मोर्चाही काढला होता. तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही दादर कबुतरखाना बंद होऊ नये, यासाठी कंबर कसली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कबुतरखाने बंद करु नयेत, असे आदेश महापालिकेला दिले होते.

कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही. मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखान्यातील पक्ष्यांना नियंत्रित स्वरुपात खाद्य पुरवावे. कबुतरखाने (Kabutar Khana) अचानक बंद करण्याऐवजी कबुतरांना कोणत्या वेळेत खाणे द्यावे आणि कोणत्या वेळेत देऊ नये, असा नियम तयार करता येईल. तसेच कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कबुतराची विष्ठा साफ करण्याचे तंत्र आहे, त्याचाही विचार करा. यासंदर्भात माझी मनेका गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. हायकोर्टात राज्य सरकार आणि महापालिकेने ठाम भूमिका मांडावी. पर्यायी व्यवस्था होईस्तोवर महापालिकेने कबुतरांना कंट्रोल फिडिंग करावे. यासंदर्भात गरज पडली तर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=3i0bztbziwc

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाने जैन समाज आनंदी, दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री आज तातडीने हटवणार

आमच्यावर 100 टक्के टॅक्स लावा, आम्ही भरण्यास तयार; कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही’; कबुतरांना खाणं देण्याची जबाबदारीही बीएमसीलाच दिली

आणखी वाचा

Comments are closed.