गोरेगाव कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी, ॲपच्या माध्यमातून अमली पदार्थ पुरवले, धक्कादायक माहिती

मुंबई क्राईम न्यूज: मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलातील (Goregaon Nesco Centre Case) लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची खळबळhनाक घटना घडली होती. मुंबईच्या गोरेगाव (Goregaon Crime) पूर्वेकडील नेस्को संकुलात ही धक्कादायक घटना असून या प्रकरणाच्या तपासात दिवसास्कोअरर धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्युझिक कॉन्सर्टमध्ये कुरिअरद्वारे तरुणांना ड्रग्स पुरवलं जात असल्याचं तपासात उघड झालं आहे. ॲपच्या माध्यमातून आनंद पटेल हा ड्रग्स पुरवत असल्याचं तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रतीक पांडेद्वारे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली आहे. (गोरेगाव म्युझिक कॉन्सर्ट प्रकरण)

Goregaon Music Concert Case : प्रतीक पांडेचा चौकशीत धक्कादायक खुलासा, कॉन्सर्टमध्ये No Camera Policy

प्रतीकच्या जबाबावर ड्रग पुरवल्याच्या आरोपाखाली आनंद पटेलला कल्याणवरून अटक करण्यात आली आहे. तर आधी देखील आनंदने ड्रग पाठवल्याच्या प्रतीक पांडेचा चौकशीत खुलासा झाला आहे. तर दुसरीकडेनेस्कोमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये No Camera Policy राबवण्यात आल्याची माहिती तपासत पुढे आली आहे. कॉन्सर्टसाठी आलेल्यांना मोबाईलवरील कॅमेरावर लावण्यास स्टिकर देण्यात आले होते. कॉन्सर्टपरिसरात फोन कॅमेरावर बंदी घालण्यात आली होती. तर तशा सूचना देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देण्यात आल्या होत्या. त्याचं सोबत कॉन्सर्ट परिसरात देखील अशा सूचना लावण्यात आल्या होत्या. फोन कॅमेरावरील स्टिकर काढले तर बाहेर काढण्यात येइल, अशी माहिती देखील देण्यात आली होती. दरम्यानअशा सूचना करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावरुन डिलीट केल्या आहेत. सोबतच अशा सूचना देणारे काही सोशल मीडिया अकउंट्स देखील deactivate करण्यात आले आहेत. फक्त फोन कॅमेरावर बंदी का घातली? त्या मागचं नेमकं कारण काय? असे अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे.

Mumbai Crime News : मृत्यूनंतर ड्रग्ज तस्करीचा मुद्दा पून्हा एरणीवर

दरम्यानगोरेगाव कॉन्सटमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज तस्करीचा मुद्दा पून्हा एरणीवर आला आहे. मुंबईत बहुतांश ड्रग्ज हे परेशातून येतं, अशा ड्रग्ज तस्करांविरोधात DRI कडून विशेष कारवाई केली जाते. मुंबई विमानतळावर विविध तपासयंत्रणांनी मागील दीड वर्षात तब्बल 1407 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तर या कारवाईत तब्बल 286 जणांवर डीआरआयने अटकेची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे DRI ने या कारवाई दरम्यान जप्त केलेल्या ड्रग्जपैकी 1200 किलो ड्रग्ज हे बँकाँकहून भारतात आणण्यात आले आहे. तसेच कधी साहित्यातून तर कधी शरीरात गोळ्या लपवून ही ड्रग्ज तस्करी होत असल्याचे अनेक गुन्ह्यातून समोर आले आहे. हल्ली महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा वापर या आंतरराष्ट्रीय तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात केल जात असल्याचे अनेक गुन्ह्यांमधून निदर्शनास आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.