हार्दिक पंड्याच्या ट्रेडची चर्चा अन् मुंबई इंडियन्सने मोठा डाव टाकला! राजस्थानचा तगडा माणूस ताफ्यात दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. परिणामी संघाला लाजीरवाण्या पराभवांचा सामना करत स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला होता. या सर्व कामगिरीचा विचार करता हार्दिक पंड्याच्या ट्रेडच्या चर्चांना उधान आले आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाचा मुंबई इंडियन्सने मोठा डाव टाकत झुबीन भरूचा यांनी संघाच्या ‘डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स’पदी नियुक्ती केली आहे.

मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील सुमार कामगिरी आणि संघाची विस्कटलेली घडी पुन्हा योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी सध्या संघ व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभुमीवर झुबीन भरूचा संघाच्या ‘डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स’पदी नियुक्ती संघाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईच्या ताफ्यात सामील होण्यापूर्वी झुबीन भरुचा यांनी राजस्थान रॉयल्ससोबत दीर्घकाळ काम केले असून, तिथे त्यांनी टीम डायरेक्टर आणि डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स यांसारख्या महत्त्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत. राजस्थान रॉयल्यमध्ये असताना त्यांनी अनेक चांगले खेळाडू घडवले. सध्या तुफान फॉर्मात असलेला वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयसवालसुद्धा त्यांच्या तालमीत तयार झाले आहेत. या खेळाडुंच्या क्रिकेट कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

झुबीन भरूचा आता मुंबई इंडियन्सच्या उच्च-कार्यक्षमता प्रणालीत ते विद्यमान सपोर्ट स्टाफसोबत मिळून खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहेत. कोचिंग आणि क्रिकेट प्रशासनात येण्यापूर्वी, झुबिन भरुचा यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले होते, ज्यामुळे त्यांना खेळाडू आणि प्रशासक अशा दोन्ही बाजूंनी क्रिकेटचा मोठा अनुभव लाभला आहे.

Comments are closed.