IND vs SL: दुसऱ्या सामन्यातही पाऊस अडथळा ठरणार का? हवामान अंदाजाबाबत महत्वाची अपडेट समोर

भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka 2nd Test) यांच्यातील दुसरा कसोटी सामना रविवारी, 23 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉल येथे झाला होता, जो भारतीय संघाने जिंकला होता. मात्र, पहिल्या सामन्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही पाऊस पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एक्यूवेदरच्या (AccuWeather) रिपोर्टनुसार, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचही दिवशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता सर्वाधिक म्हणजेच 96 टक्के वर्तवली गेली आहे. दिवसानुसार पावसाचा अंदाज बघितला तर, पहिल्या दिवशी 64 टक्के पावसाची शक्यता सकाळी आणि दिवसाच्या वेळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी 96 टक्के, तिसऱ्या दिवशी 91 टक्के शक्यता त्याचबरोबर चौथ्या दिवशी 60 टक्के आणि शेवटच्या दिवशी 91 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 165 धावांनी विजय मिळवला होता. भारताकडून फलंदाजीत देवदत्त पडिक्कलने (Devdatt Paddikal) पहिल्या डावात 167 आणि दुसऱ्या डावात 44 धावांची खेळी केली होती. तसेच, गोलंदाजीत मानव सुथारने (Manav Suthar) शानदार कामगिरी करत पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या होत्या.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 47 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 23 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने 7 सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच, दोन्ही संघांमधील 17 सामने अनिर्णित राहिले आहेत.
कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर भारताचा रेकॉर्ड संमिश्र राहिला आहे. या मैदानावर टीम इंडियाने 9 कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी 3 सामन्यांत विजय, 2 सामन्यांत पराभव आणि 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.
दुसऱ्या कसोटीसाठी श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
कामिल मिश्रा, लाहिरू उदारा, पसिंदू सूरियाबंदरा, कामिंदू मेंडिस, धनंजय डी सिल्वा (कर्नाधर), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला (यष्टिररक्षक), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा आणि असिथा फर्नांडो.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, मानव सुथार, कुलदीप यादव/सारांश जैन, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
Comments are closed.