मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांचा उत्साह टी 20 वर्ल्ड कपच्या विजेतेपदामुळं शिगेला पोहोचलेला आहे. याच दरम्यान आयपीएलच्या पहिल्या सामन्याची तारीख सर्वप्रथम जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार आयपीएल 28 मार्चपासून सुरु होणार आहे. बीसीसीआयनं आज आयपीएलच्या पहिल्या 16 दिवसांमधील 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबई इंडियन्स या 20 पैकी चार सामने खेळणार आहे. मुंबईचा पहिला सामना 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.

मुंबई कोणाविरोधात खेळणार?

आयपीएलच्या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. हार्दिक पांड्या नेतृत्त्वात आणि रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव या सारख्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईला यंदा आयपीएलच्या मोहिमेची सुरुवात करत असताना पहिलं आव्हानं कोलकाता नाईट रायडर्सचं असेल. हा सामना 29 मार्चला सायंकाळी 7.30 वाजता सुरु होईल. मुंबईचा हा सामना वानखेडे स्टेडियमवर होईल.

मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध दिल्लीत होईल. हा सामना 4 एप्रिलला होणार आहे. यानंतर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना गुवाहाटीत होईल. हा सामना 7 एप्रिलला होईल. यानंतर चौथ्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ मुंबईत दाखल होईल. मुंबईत हार्दिक पांड्याच्या संघाचा सामना गतविजेत्या आरसीबीसोबत होणार आहे. हा सामना 12 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. या सामन्याची मुंबईच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता असेल. कारण या सामन्यात रोहित शर्मा मुंबईकडून मैदानात असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहली मैदानात असेल. क्रिकेट चाहत्यांसाठी मुंबई आणि बंगळुरु यांच्यातील सामना पर्वणीच ठरणार आहे.

मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ संपणार?

मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माच्या नेतृत्त्वात  2020 मध्ये शेवटचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर मुंबईला विजेतेपद मिळालेलं नाही.   मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा ऐवजी कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे दिलं. मात्र, मुंबईला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. आता हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असलेला मुंबईचा संघ 19 व्या हंगामाचं विजेतेपद मिळवून दुष्काळ संपवणार का हे पाहावं लागेल.

मुंबई इंडियन्सचा संघ

हार्दिक पंड्या (कर्ंधर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, राज बावा, रघु शर्मा, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफंझार, अश्विनी कुमार, दीपक शेरफर्ड, मार्क्स चहर, विल जॅक चहर, रॉबिन शेरडे, रॉबिन बॉश. शार्दुल ठाकूर, क्विंटन डी कॉक, दानिश मलेवार, मोहम्मद इझार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत

मुंबईच्या सामन्यांचं वेळापत्रक

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च, मुंबई (सायं.7.30 वाजता)

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 4 एप्रिल, दिल्ली (दुपारी 3.30 वाजता)

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 7 एप्रिल, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 12 एप्रिल, मुंबई (सायं.7.30 वाजता)

आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु  विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 28  मार्च, बंगळुरु (सायं.7.30 वाजता)

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च, मुंबई (सायं.7.30 वाजता)

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 30 मार्च, गुवाहाटी  (सायं.7.30 वाजता)

पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स, 31 मार्च, न्यू चंदीगड, (सायं.7.30 वाजता)

लखनौ सुपर जायंटस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 1 एप्रिल, लखनौ (सायं.7.30 वाजता)

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद,2 एप्रिल,कोलकाता (सायं.7.30 वाजता)

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज,3 एप्रिल, चेन्नई (सायं.7.30 वाजता)

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 4 एप्रिल, दिल्ली (दुपारी 3.30 वाजता)

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 4 एप्रिल, अहमदाबाद (सायं.7.30 वाजता)

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंटस, 5 एप्रिल, हैदराबाद, (दुपारी 3.30 वाजता)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, बंगळुरु (सायं.7.30 वाजता)

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 6 एप्रिल, कोलकाता (सायं.7.30 वाजता)

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 7 एप्रिल, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 8 एप्रिल, दिल्ली  (सायं.7.30 वाजता)

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस, 9 एप्रिल, कोलकाता (सायं.7.30 वाजता)

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 10 एप्रिल, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)

पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 11 एप्रिल, न्यू चंदीगड (दुपारी 3.30 वाजता)

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 11 एप्रिल, चेन्नई (सायं.7.30 वाजता)

लखनौ सुपर जायंटस विरुद्ध गुजरात टायटन्स, 12 एप्रिल, लखनौ (दुपारी 3.30 वाजता)

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 12 एप्रिल, मुंबई (सायं.7.30 वाजता)

हेदेखील वाचा

Comments are closed.