आधीच पाण्याची बोंब…मुंबईकरांच्या 34 टक्के पाण्याला चोरी आणि गळतीचे भगदाड, पालिका प्रशासनाची कबुली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईला सात धरणांतून सुमारे 150 किमीहून येणाऱ्या पाण्यातील 34 टक्के पाणी चोरी आणि गळतीमध्ये वाया जात आहे. याचा परिणाम मुंबईच्या पाणी पुरवठय़ावर होत असल्याची कबुलीच आज स्थायी समितीत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. हे वाया जाणाऱ्या पाण्यातील किमान 10 टक्के म्हणजे 500 दशलभ लिटर पाणी वाचवण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी सातही धरणे सध्या भरली असली तरी अल निनोच्या प्रभावामुळे राज्य सरकारने पालिकेला ऑगस्ट 2027पर्यंतच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालिका पालिका नियोजन करीत आहे. त्यामुळेच सद्यस्थितीत सुरू असणारी 10 टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे संकेतही पालिका प्रशासनाकडून आज देण्यात आले.  धरणातील पाणीसाठा व राज्य सरकारकडून मिळणारा 2 लाख 30 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा एकत्र केला तर 31 जुलै 2027पर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. यावेळी सभागृह नेते गणेश खणकर यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे, नगरसेविका श्रद्धा जाधव, मीनाक्षी पाटणकर, दीपमाला बढे आदींनी चर्चेत भाग घेत पाणी प्रश्न मांडून प्रशासनाला सूचनाही केल्या.

पाणी चोरीला चाप लावणार

नव्या धोरणानुसार टँकरमधून पालिकेच्या जलवाहिन्यांमधून अनधिकृतरीत्या पाणी उचलले जाणार नाही, तर विहिरींच्या पाण्याचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी ओटीपी आधारित प्रणाली विकसित करण्यात येत आहे.

अशा करणार उपाययोजना

अनधिकृत पाणी जोडण्या ज्या भागांत कायदेशीररीत्या नियमित करता येऊ शकतात, त्या नियमित करणे हा एनआरडब्ल्यू कमी करण्याचा एक मार्ग असल्याचे अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. n जून 2022 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘सर्वांसाठी पाणी’ उपक्रमा अंतर्गत पालिकेने तब्बल 26,774 पाणी जोडण्या दिल्या आहेत. त्यामुळे अशा जोडण्यांमधून वापरले जाणारे पाणी एनआरडब्ल्यूमध्ये जाण्याऐवजी पालिकेच्या महसुलात आणणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

Comments are closed.