तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी? धनश्री म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्धची लढत

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत (BMC Election) अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून निष्ठावंतांना संधी न मिळाल्याने मोठं नाराजीनाट्य देखील पाहायला मिळालं होतं. तर, फेसबुक लाईव्ह करत माजी आमदार विनोद घोसळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकरचा खून करण्यात करण्यात आल्याची धक्कादायक घटनाही घडली होती. या घटनेनंतर समाजमाध्यमातून त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या पुढे आल्या. Tejaswi Ghosalkar (तेजस्वी घोसाळकर) यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात केला आणि दहीसर वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी मिळवली होती. सध्या दहीसर वार्ड क्रमांक 2 मधील निवडणुकीकडे मुंबईचे लक्ष लागले असून तेजस्वी घोसाळकर यांच्याविरुद्ध शिवसेनेनं (Shivsena) त्यांच्याच मैत्रिणीला मैदानात उतरवलं आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली असून मुंबईच्या दहिसर विधानसभेतील प्रभाग 2 मध्ये एकेकाळच्या मैत्रिणी असलेल्या तेजस्वी घोसाळकर विरुद्ध धनश्री कोलगे यांच्यात लढत होत आहे. मात्र, ही लढत निष्ठावंत विरुद्ध गद्दार, टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावरील काम करणारा चेहरा, बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार अशी लढत होणार असल्याचे धनश्री कोलगे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे.

धनश्री कोलगे कोण?

धनश्री कोलगे या युवा सेना कार्यकारिणी सदस्य असून दहीसरमधील वार्ड क्रमांक 2 मधून शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार आहेत. येथील वार्डमध्ये शिवसेना कार्यकर्ती म्हणून त्यांचं काम आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेत पक्षाने त्यांना तेजस्वी घोसाळकर यांच्याविरुद्ध मैदानात उतरवलं आहे. माझ्या समोर जरी घोसाळकर कुटुंबीयांची सून असली तरी विनोद घोसाळकर यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असून त्यांनी आमच्यावर कुठेही अविश्वास दाखवला नाही, असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभाग दोन मधील उमेदवार धनश्री कोलगे यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, विनोद घोसाळकर यांचाही त्यांच्या प्रचारात सहभाग पाहायला मिळत असून सुनेनं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते. आता, मुंबई महापालिका निवडणुकीत विनोद घोसाळकर हे शिवसेना उबाठा पक्षासाठी काम करत आहेत, तर त्यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर ह्या भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत.

तेजस्वी घोसाळकर कोण?

जस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. सन 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली, त्याचवेळी त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली.

हेही वाचा

मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध

आणखी वाचा

Comments are closed.