ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना! मनसेचे नेते पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे (Mahapalika Election)  बिगुल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 23 डिसेंबरपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्यास केवळ तीन दिवसच शिल्लक राहिले आहेत. तरीदेखील ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही.

दादर-माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडुप, चांदिवली या मतदारसंघातील जागांवर तिढा अद्याप कायम

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार दादर-माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडुप, चांदिवली या मतदारसंघातील जागांवर तिढा अद्याप कायम आहे. या मतदारसंघात किमान 2 ते 3 जागा द्याव्यात अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. आज रात्री पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. मातोश्री येथे झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मनसे चे नेते पुन्हा शिवतीर्थ येथे दाखल झाले आहेत.

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार, 114 हा बहुमताचा आकडा कोण गाठणार?

राज आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे भावांनी 24 डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला आली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आता ‘ठाकरे बंधू विरुद्ध महायुती’ असा थेट सामना रंगणार आहे. मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी 114 हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना (महायुती) एकत्र लढणार आहे.  त्यामुळं या निवडणुकीत बहुमताचा म्हणजेच 114 जागांचा जादुई आकडा कोण गाठणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. मुंबईत 227 प्रभांगापैकी जवळपास 150 जागांवर मराठी मतांचा प्रभाव आजही आहे. त्यामुळे याठिकाणी काय होणार याची उत्सुकता लागली आहे. त्यासोबतच काही ठिकाणी आता मुस्लीम मतदारही ठाकरे बंधुंकडे वळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा फायदा ठाकरे बंधूना होऊ शकतो, असे मत देखील काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

महापालिका निवडणूक वेळापत्रक

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026

अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026

मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026

मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026

महत्वाच्या बातम्या:

मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.