‘लोटसशिवाय ऑपरेशन टायगर शक्य नाही, मुंबई पालिकेतही ऑपरेशन लोटस राबवलं जाणार’

मुंबई : ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंकडे येणार असतील तर अभिनंदन आहे, असे मत मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी व्यक्त केले. महापौर पदाची स्वप्न कोणीही पाहू शकत असेही ते म्हणाले. काही दिवसात आमचाही आकडा वाढेल असा सूचक इशारा देखील गणेश खणकर यांनी दिला. ऑपरेशन लोटस नेहमी सुरु असतं, पालिकेत देखील ऑपरेशन लोटस राबवले जाणार असल्याची माहिती खणकर यांनी दिली.

ऑपरेशन टायगर हे लोटस शिवाय शक्य नाही असेही  मुंबई महापालिकेतील भाजपच गटनेते गणेश खणकर म्हणाले. अनेक नगरसेवकांचा आकडा येत्या काळात वाढणार असल्याचेही  गणेश खणकर म्हणाले. महापौर पदाची स्वप्न कोणीही पाहू शकत. काही दिवसात मुंबई महापालिकेतील आमचाही आकडा वाढू शकतो असा सूचक इशारा देखील खणकर यांनी दिला आहे.

Comments are closed.