आधी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार, त्यांनंतर ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या (Uddhav Thackeray) युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरला असून उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, युतीच्या घोषणेआधी दोन्ही ठाकरे बंधू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास एकत्र येऊन अभिवादन करणार आहेत.

उद्या  दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता  मनसे अध्यक्ष राज  ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख साहेब ठाकरे हे शिवाजी पार्क येथील हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करतणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ठाकरे बंधुच्या युतीचा मुहर्त अखेर ठरला आहे.  उद्या (बुधवारी) दुपारी 12 वाजता राज ठाकरे व उद्धव ठाकरे  म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना – ठाकरेंची शिवसेना यांच्या महापालिका निवडणुकीसंदर्भात होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेस संबोधित करणार आहेत.  हॅाटेल ब्लू सी, 11 खान अब्दुल गफार खान रेाड, वरळी सी फेस, वरळी,मुंबई – 30. येथे पत्रकार परिषद होणार आहे.

ठाकरे बंधुंच्या युतीची उद्या 12 वाजता घोषणा होणार

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधुंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरला असून उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. या दोन्ही नेत्यांकडून उद्या दुपारी ठाकरे बंधूंच्या युती आणि जागावाटपाची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-मनसे एकत्र आल्याने ठाकरेंची ताकद वाढली आहे.

शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली

शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहेत. कोणाच्या मनात संभ्रम नाही. तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेलं असून जागावाटपवर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं. युती झालेली आहे, केवळ जागावाटपासंदर्भातली घोषणा बाकी आहे. आमच्यात जागावाटपावरून कोणताही विसंवाद नाही. वरळीमधील डोमममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली, असंही संजय राऊत म्हटलं. त्यानुसार, आता ट्विट करुन संजय राऊत यांनी युतीच्या घोषणेचा मुहूर्त सांगितला आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज

आणखी वाचा

Comments are closed.