मुंबईत ATS ची मोठी कारवाई, दहशतवादी संघटनेशी संबंधित रॅपिडो चालकाला अटक
माहिम भागात रॅपिडो बाईक चालवणाऱ्या एका तरुणाला मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. मोहम्मद हसन अख्तर असे आरोपीचे नाव असून त्याच्या फोनमध्ये दहशतवादाशी संबंधित काही ऑडियो व्हिडीओ क्लिप सापडल्याचे समजते. मुंबई ATS च्या काळाचौकी युनिटने ही कारवाई केली.
हसनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मोबाईल, सोशल मीडिया अकाऊंट्स तपासले असता त्यात पोलिसांना त्यात जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्या भडकाऊ भाषणांचे ऑडिओ सापडले. तसेच हसनने अनेक ठिकाणी भडकवणाऱ्या कमेंट पोस्ट केल्या आहे. तसेच जिहादचे समर्थन करणाऱ्या पोस्टही त्याने लोकांना पाठवले आहेत. सध्या पोलीस त्याची कसून टौकशी करत आहेत
Comments are closed.