शिवतीर्थवर निघताना कार्यकर्ते म्हणाले नवीन वर्ष सत्तेचं जावो, उद्धव ठाकरे म्हणाले तथास्तू
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक (Mumbai Mahapalika election) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीसाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. या ठाकरे बंधुंमध्ये तब्बल चार तास बैठक चालली. या बैठकीनंतर गाडीतून जाताना उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्यांकडून नवीन वर्ष सत्तेच जावो, अशा शुभेच्छा मिळल्या. यावर बोलताना उद्धव ठाकरे तथास्तू असे म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात आज तब्बल चार तास चर्चा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात आज तब्बल चार तास चर्चा झाली आहे. या चार तासात वचननामा, सभा, रॅली आणि निवडणूक प्रचार गाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. उद्या निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने ठाकरेंच्या युतीत जर कोणी बंडखोर असतील तर त्याकडे स्थानिक पातळीवरवलक्ष देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे बैठक संपवून जाताना कार्यकर्त्यांनी त्यांना नवीन वर्ष सत्तेच जावो: अशा शुभेच्छा दिल्या. यावर बोलताना उद्धव ठाकरे तथास्तू म्हणाले.
उद्धव ठाकरे शिवतीर्थावरुन निघाले तेव्हा नेमकं काय घडलं?
मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा महायुती विरुद्ध ठाकरे बंधू विरुद्ध काँग्रेस-वंचित आघाडी असा तिरंगी सामना होत आहे. ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र लढत आहेत. त्यांच्या समोर प्रामुख्यानं सत्ताधारी महायुतीचं आव्हान आहे. लवकरच प्रचाराला सुरुवात होणार आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंची बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 4 तास चर्चा झाली. उद्धव ठाकरे कारमधून शिवतीर्थावरुन निघाले. त्यावेळी राज यांच्या बंगल्या बाहेर काही जण त्यांच्या भेटीसाठी उभे होते. त्यांना पाहून उद्धव ठाकरेंनी कार थांबवली. उद्धव ठाकरेंनी कारची काच खाली घेतली. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हस्तांदोलनदेखील केलं. यावेळी एका व्यक्तीनं उद्धव ठाकरेंना नवीन वर्ष सत्तेचं जावो, अशा शुभेच्छा दिल्या. त्यावर उद्धव ठाकरे दिलखुलास हसले आणि तथास्तु म्हणाले. यानंतर त्यांची कार मातोश्रीच्या दिशेनं रवाना झाली.
महत्वाच्या बातम्या:
मुंबईत ठाकरेंचं विजयाचं गणित ठरलं? तब्बल चार तास बंद दाराआड खलबतं, नेमकी काय झाली चर्चा?
आणखी वाचा
Comments are closed.