Mumbai News – मध्य रेल्वेची प्रवाशांना भेट, सहा एकमार्गी विशेष गाड्या चालवणार

मध्य रेल्वेकडून सहा एक-मार्गी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई-नागपूर, मुंबई-अमरावती, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-सोलापूर दरम्यान एक-मार्गी विशेष गाड्या चालवणार आहे.

गाडी क्रमांक 01119 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर ही एक-मार्गी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रविवारी, 27 सप्टेंबर 2026 रोजी 11.30 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी 3.00 वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर गाडी क्रमांक 01109 ही एक-मार्गी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवारी 28 सप्टेंबर 2026 रोजी 00.25 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 15.32 वाजता पोहोचेल.

या दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमरावती गाडी क्रमांक 01107 ही एक-मार्गी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रविवारी 27 ,सप्टेंबर 2026 रोजी 15.30 वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी 05.20 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा येथे थांबे देण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर गाडी क्रमांक 01111 ही एक-मार्गी विशेष गाडी सोमवारी 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे त्याच दिवशी रात्री 22.40 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज आणि हातकणंगले येथे थांबे देण्यात येतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस – सोलापूर गाडी क्रमांक 01115 ही एक-मार्गी विशेष गाडी रविवारी 27 सप्टेंबर 2026 रोजी 21.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि सोलापूर येथे दुसऱ्या दिवशी 6.30 वाजता पोहोचेल. तर लोकमान्य टिळक टर्मिनस – सोलापूर गाडी क्रमांक 01117 ही एक-मार्गी विशेष गाडी सोमवारी 28 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 21.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि सोलापूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबे देण्यात येतील.

Comments are closed.