Mumbai News – इनोव्हा कारच्या धडकेत 8 वर्षीय मुलाचा मृत्यू, आरोपी महिला चालकाला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भरधाव इन्होव्हा कारच्या धडकेत आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी वांद्रे येथे घडली. याप्रकरणी आरोपी महिलेविरोधात वांद्रे पोलिसांनी कलम 105, 281, 125 भारतीय न्याय संहिता (BNS) सहकलम 184 मोटर वाहन कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. मेघा रावल असे आरोपी महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बांद्रे पश्चिम येथील जिजामाता गार्डनसमोर 8 वर्षीय अंश गुप्ता हा रस्ता ओलांडत होता. यादरम्यान आरोपी महिला चालक मेघा रावल ही मोबाईलवर बोलत तिच्या ताब्यातील इनोव्हा क्रिस्टा कार चालवत होती. मोबाईलवर बोलण्याच्या नादात मेघाने अंशला जोरदार धडक दिली आणि त्याच्या अंगावरून गाडी नेली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंशला उपचारासाठी हॉली फॅमिली हॉस्पिटल येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.