भाभा रुग्णालयात महिला डॉक्टरला धमकी; दोन युट्यूबर विरोधात गुन्हा दाखल करुन अटक
मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील भाभा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरला धमकावल्या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी दोन युट्युबर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी उपचारादरम्यान वाद घालत डॉक्टरांच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा आणणे आणि धमकी देण्याच्या कलमांखाली कुर्ला पोलिसांनी गुन्हा नोंदवून 2 आरोपीला अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव अफजल शेख आणि जैन अब्बास असून यातील एक आरोपी मुंब्रा परिसरात राहणारा आहे, तर एक कुर्ला परिसरामध्ये राहणारा आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपीने मुंबई शहरात मागील काही महिन्यापासून पोलिसांसोबत, त्यासोबतच इतर लोकांसोबत देखील हुज्जत आणि गोंधळ घालून थैमान घातले होते. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी या आरोपीला अटक करुन यापूर्वी किती लोकांना त्रास दिला आहे, त्यासोबत किती लोकांकडून खंडणी घेतली आहे, या संदर्भात पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.