Mega Block – मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार
अभियांत्रिकी आणि देखभालदुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन फास्ट मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत हा ब्लॉक असेल.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटीहून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि त्यांच्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ब्लॉक कालावधीत सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्टेशनवर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्टेशन दरम्यान नियोजित थांबे घेतील. त्यानंतर माटुंगा स्टेशनवर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
ब्लॉक कालावधीत ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ठाणे आणि वाशी/नेरुळ स्टेशन दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील सेवा बंद राहतील. या कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्टेशन दरम्यानच्या अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात येतील.
ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील गाड्या सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 पर्यंत आणि पनवेल/नेरुळ/वाशी ते ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील गाड्या सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 पर्यंत रद्द करण्यात येतील.
Comments are closed.