वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
सोलापूर येथील शरदचंद्र पवार शाळेत दहावी शिकणाऱ्या धनश्री पवारचे वडील भिकाजी पवार यांचे 20 फेब्रुवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले होते. त्यावेळी धनश्रीचे दहावीचे बोर्डाचे पेपर सुरू होते. वडिलांचा ज्या दिवशी अंत्यविधी होता त्याच दिवशी धनश्रीचा मराठीचा पेपर होता. आधीच वडिलांच्या निधनामुळे खचलेली धनश्रीला मुख्यध्यापक व नातेवाईकांनी समजावले. त्यानंतर ती मोठ्या हिंमतीने उभी राहिली. तिने दीड तासात मराठीचा पेपर लिहला व वडिलांच्या अंत्यविधीसाठी घरी आली.
आज दहावीचा रिझल्ट लागला असून धनश्रीला मराठी विषयात 65 गुण मिळाले आहेत. धनश्री 55 टक्के मिळवून दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. दहावीनंतर व्होकेशनल कोर्स एम एल टी करून स्वतःच्या पायावर उभ राहून वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे धनश्रीने सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने , शिक्षक राजाराम शितोळे, नितीन मिस्कीन, श्रीराम बरगंडे, आनंद कोळी, श्वेता बाळशंकर, सुलक्षणा भरगंडे, अर्चना शिंदे, स्वाती नागटिळक, मंजुळा संगा, वैशाली सोनटक्के यांनी आज धनश्रीचा घरी जाऊन सत्कार केला व तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी धनश्रीची आई सुप्रिया पवार, भाऊ विजय पवार व मोठी बहीण वैष्णवी इत्यादी उपस्थित होते.
Comments are closed.