Megablock – मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, ट्रान्स हार्बरवरील सेवा बंद राहणार
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामाकरीता रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार आणि ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 8.00 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
ब्लॉक काळात गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस, गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस, गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस या डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गिकेवर वळवल्या जातील आणि ठाणे स्थानकावर पुन्हा पाचव्या मार्गिकेवर वळवल्या जातील. परिणामी त्या 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
गाडी क्रमांक 11010 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12124 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन, गाडी क्रमांक 12134 मंगळुरू -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक 13201 राजगीर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक 17221 काकीनाडा पोर्ट- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12168 बनारस -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12321 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 12812 हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या ‘अप’ मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावर ‘अप जलद’ मार्गिकेवर वळवल्या जातील आणि विद्याविहार येथे पुन्हा सहाव्या मार्गिकेवर वळवल्या जातील.
ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तसेच ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील. पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे येणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील.
Comments are closed.