एसटीचा प्रवास महागला! वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर 13.56 टक्क्यांची भाडेवाढ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा प्रवास आता महागला आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणाऱ्या एसटीच्या तिकिट दरात आता मोठी वाढ झाली आहे. महामंडळाने एसटीच्या तिकिट दरात 13.56 टक्के भाडेवाढ केली असून आज मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना आता एसटीच्या या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड पडणार आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किमतीत वाढ झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली वाढ, वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यामुळे एसटीच्या तिकिट दरात 13.56 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

एसटीच्या सर्व बस सेवांसाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. यापूर्वी एसटी महामंडळाने उन्हाळी गरमीच्या हंगामात 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ लागू केली होती. ती भाडेवाढ दोनदा वाढवण्यात आली होती. अखेर हंगामी भाडेवाढ मागे घेत महामंडळाने कायमस्वरुपी भाडेवाढीचा धक्का सर्वसामान्य प्रवाशांना दिला आहे.

Comments are closed.