पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन जम्बो ब्लॉक, रविवारी दिवसा ब्लॉक नाही
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. रविवारी 26 जुलै रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
शनिवारी 26 जुलै रोजी 00.25 ते 04.25 या वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.
Comments are closed.