अॅक्वा लाईन मेट्रोच्या बीकेसी स्थानकात आढळला घोणस साप, सर्पमित्राकडून सुखरुप सुटका
अॅक्वा लाईन मेट्रोच्या बीकेसी स्थानकात विषारी घोणस साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. तात्काळ बचाव पथक आणि सर्पमित्राला याची माहिती देण्यात आली. बचाव पथक आणि सर्पमित्राने तात्काळ घटनास्थळी धाव घेत या सापाची सुखरुप सुटका करत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मेट्रो मार्ग 3 स्थानकाच्या ‘A5 ऑडिट बिल्डिंग’ एक्झिटजवळ सकाळी मंगळवारी 7.47 च्या सुमारास घडली. सुरक्षा रक्षकांना बीकेसी मेट्रो स्थानकाच्या ‘बेसमेंट-2’ मध्ये भिंतीजवळ साप आढळला. या सापाची अंदाजित लांबी दोन ते अडीच फूट होती. या घटनेची माहिती नियंत्रण कक्ष आणि मुंबई वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
सर्पमित्र अतुल कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव मोहीम पूर्ण केली. सर्पमित्रांनी या सापाची ओळख घोणस अशी पटवली. सापाला सुरक्षितपणे एका डब्यात ठेवण्यात आले आणि त्यानंतर वन विभागाच्या नियमांनुसार त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या घटनेनंतर, घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांना सापांचे वर्तन आणि वन्यजीवांचा सामना करताना घ्यायची सुरक्षितता यांबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
Comments are closed.