मध्य रेल्वे मार्गावर तब्बल 15 दिवसांचा विशेष ब्लॉक; टिटवाळ्यातील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे रेल्वे वाहतूक कोलमडणार
प्लॅटफॉर्मच्या कामामुळे मध्य रेल्वेवरील टिटवाळा येथे तब्बल 15 दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. टिटवाळा स्थानकात 15 डब्यांच्या गाड्यांसाठी फलाटाचा विस्तार करण्याकरीता 28 ऑगस्ट 2026 मध्यरात्रीपासून 11 सप्टेंबर 2026 मध्यरात्रीपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
कल्याण आणि वासिंद स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ईशान्य दिशेकडे रात्री 11.30 ते पहाटे 5.10 दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. ब्लॉकमुळे काही लांबपल्ल्याच्या व उपनगरीय गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील तर काही विलंबाने धावतील.
गाडी क्रमांक 11048 गोरखपूर – दादर एक्सप्रेसचे 28 ऑगस्ट 2026 आणि 1 सप्टेंबर 2026 रोजी वासिंद येथे, तसेच दिनांक 30 आणि 31 ऑगस्ट 2026 रोजी आटगाव येथे नियमन केले जाईल. गाडी क्रमांक 11044 बलिया – दादर एक्सप्रेसचे दिनांक 29 आणि 30 ऑगस्ट 2026 रोजी आटगाव येथे आणि 31 ऑगस्ट 2026 आणि 1 सप्टेंबर 2026 रोजी वासिंद येथे नियमन केले जाईल.
गाडी क्रमांक 12102 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल आणि गाडी क्रमांक 15181 मऊ – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 10 ते 20 मिनिटे उशिरा पोहोचतील. उशिरा धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या किंवा सुट्टीकालीन विशेष गाड्यांचे मार्ग बदलले जाऊ शकतात किंवा परिचालन आवश्यकतेनुसार त्यांचे नियमन केले जाऊ शकते. ब्लॉक कालावधीत शुक्रवारी रात्री टिटवाळा आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील.
'किंवा' उपनगरीय लोकल रद्द
- 28 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 22.00, 22.50 आणि 23.42 वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – टिटवाळा उपनगरी लोकल
- 29 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.08 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कसारा उपनगरी ट्रेन.
- 28 ऑगस्ट 2026 रोजी टिटवाळा येथून 21.00 आणि 22.06 वाजता सुटणाऱ्या टिटवाळा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी लोकल.
- 28 ऑगस्ट 2026 रोजी टिटवाळा येथून 23.14 वाजता सुटणारी टिटवाळा-ठाणे उपनगरी ट्रेन.
- 28 ऑगस्ट 2026 रोजी आसनगाव येथून 23.08 वाजता सुटणारी आसनगाव-ठाणे उपनगरी लोकल.
‘या’ उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन
- 28 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 20.56 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनगाव उपनगरी गाडी टिटवाळा येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
- 28 ऑगस्ट 2026 रोजी डोंबिवली येथून 22.00 वाजता सुटणारी डोंबिवली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन आणि कल्याण येथून 22.06 वाजता सुटणारी कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
डाऊन ईशान्य मार्गावर कसारासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 22.47 वाजता सुटेल.डाऊन ईशान्य मार्गावर टिटवाळासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 23.16 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप ईशान्य मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची उपनगरी ट्रेन कसारा येथून रात्री 22.00 वाजता सुटेल.
कसाराकडे जाणाऱ्या डाऊन ईशान्य मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 04.16 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप ईशान्य मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली उपनगरी ट्रेन कसारा येथून पहाटे 03.51 वाजता आणि टिटवाळा येथून पहाटे 04.32 वाजता सुटेल.
Comments are closed.