Ratnagiri News – नाणार बॉक्साईट प्रकल्पाची सुनावणी ७ सप्टेंबरला
राजापूर तालुक्यातील नाणार येथे 144 हेक्टर क्षेत्रामध्ये बॉक्साईट प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला कहे. यापूर्वी बॉक्साईट प्रकल्पाची सुनावणी रद्द झाली होती. आता ती सुनावणी पुढील महिन्यामध्ये 7 सप्टेंबर रोजी जनसुनावणी होणार आहे. बॉक्साईट प्रकल्प उभारणीला स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र विरोध केला जात असताना नाणार येथे बॉक्साईटच्या उत्खननला परवानगी मिळणार की प्रकल्प रद्द होणार? याकडे आता सार्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
नाणार येथे शासनाने यापूर्वी रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित केला होता. या प्रकल्पाला स्थानिकांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. त्यानंतर,नाणार येथून रिफायनरी प्रकल्प रद्द करून तो बारसू येथे हलविण्यात आला होता. रिफायनरी प्रकल्प रद्द झालेला असताना आता नाणार येथे बॉक्साईट प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. नाणारच्या 144 हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी 0.9 मी. टन क्षमतेचे बॉक्साईट उत्खनन होणार आहे. हा खाणपट्टा गोवा येथील कंपनीला शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. रिफायनरी प्रकल्पाप्रमाणे बॉक्साईट प्रकल्पाही स्थानिक जनतेकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. स्थानिकांच्या विरोधाच्या जनरेट्यामुळे यापूर्वी या बॉक्साईट प्रकल्पासंबंधित आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी रद्द झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जनसुनावणी होणार आहे. या बॉक्साईट प्रकल्पाच्या अनुषंगाने पुढील महिन्यामध्ये (7 सप्टेंबर,2026) पर्यावरणविषयक जनसुनावणी सागवे येथील श्री कात्रादेवी मंगल कार्यालय येथे जनसुनावणी होणार आहे. मात्र, विविध कारणांमुळे विरोधाचा जनरेटा पाहता रिफायनरी प्रकल्पाप्रमाणे नाणार येथून बॉक्साईट प्रकल्प जाणार की राहणार? याकडे आता सार्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
स्थानिकांचा विरोध
नाणारचे माजी सरपंच ओंकार प्रभूदेसाई यांनी बॉक्साईट प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याची माहिती दिली आहे. नाणार परिसरात मोठ्याप्रमाणात आंबा-काजू बागायती असून अनेक शेतकरी पारंपारीक भातशेतीही करीत आहे. त्यातून, मिळणार उत्पन्न हेच येथील ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन वर्षानुवर्षे राहीलेले आहे. या बागायती-शेती यांसह येथील पर्यावरणावर बॉक्साईट उत्खननाचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. त्यातून सर्वसामान्यांचे उत्पादन अन् उत्पन्नाचे साधन हिरावून घेतले जाणार आहे. मानवी जीवनावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नाणार बॉक्साईट प्रकल्पाला आम्हा सर्व ग्रामस्थांचा ठाम विरोध असल्याचे प्रभूदेसाई यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.
Comments are closed.