मुंबईतील रेल्वे स्टेशनवर विकृताची मुलीवर वाईट नजर, सर्वांदेखत अश्लील हातवारे, संतापलेल्या मुली


मुंबई: मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दिवसाढवळ्या महिलांची छेड काढणारे व विनयभंग करणारे प्रकार गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. अशातच  गोवंडी रेल्वे स्थानकातील एक व्हिडिओ सोशल (Video Viral on social Media) मिडीयावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ गोवंडी रेल्वे स्थानकावर घडल्याची माहिती आहे, तर या घटनेचा व्हिडिओ सोशल (Video Viral on social Media) मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हा व्हिडीओ काढणाऱ्या तरूणीचं कौतुकही केलं जात आहे.(Mumbai News)

Mumbai News: नेमकं प्रकरण काय?

गोवंडी रेल्वे स्टेशनवर एका तरुणीने तिच्याशी अश्लील हावभाव करणाऱ्या एका तरुणाला चांगला धडा शिकवल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेची वाट पाहत असलेल्या तरुणीसमोर एक तरूण संतापजनक हावभाव इशारे करत होता. मात्र, त्या तरुणीने धाडस दाखवत त्याचा व्हिडिओ काढला आणि थेट त्याच्यासमोर जाऊन त्याला याबबातचा जाब विचारला, त्याचबरोबर त्याच्या कानशिलात देखील लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चर्चेत असून व्हिडिओमध्ये दिसतंय की, गोवंडी स्टेशनवर एक तरुण मुद्दाम तरुणीकडे पाहत अश्लील हावभाव, चाळे करत आहे. तरुणी त्याचे घाणेरडे हावभाव मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते. त्यानंतर ती प्लॅटफॉर्म बदलत थेट त्या तरुणाजवळ जाते आणि त्याला त्याच्या या हावभावाबाबत आणि वर्तनाबद्दल जाब विचारते.

“तुला व्हिडिओ दाखवू का? माझ्याकडे पाहून कोणते हावभाव करत होतास?” असा सवाल करत ती त्याला चांगलाच सुनावते आणि त्याच्या कानशिलात देखील लगावते. इतकेच नव्हे, तरुणीची अवस्था पाहून तेथे उपस्थित इतर तरुणही पुढे येतात आणि संबंधित तरुणाला चोप देतात. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तरुणीच्या धाडसाचे आणि सजगतेचे कौतुक होताना दिसत आहे. महिलांना छेडछाड करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात तिने दाखवलेल्या या निर्भीड भूमिकेचे नेटिझन्सनी स्वागत केले आहे.


आणखी वाचा

Comments are closed.