टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरण, शस्त्र पुरविणाऱ्या चौघांना कोठडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अभिनेता टायगर श्रॉफ हे टार्गेट पक्कं झाल्यानंतर मुंबईत येऊन थांबलेल्या शुटर्सना अग्निशस्त्र व काडतुसे पुरविणाऱ्या चौघांना अटक करून आज किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. त्या चौघांनाही 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कुणाल, सुमित, राधा आणि बबिता अशी त्या चौघांची नावे आहेत. कुणाल आणि सुमित यांनी अमृतसरहून पिस्तूल व काडतुसे घेतली होती. मग ती शस्त्रs घेऊन राधा व बबिता रेल्वेने मुंबईत आल्या आणि त्यांनी ते शुटर्सकडे सोपविले. हे समोर आल्यानंतर या चौघांनाही गुन्हे शाखेने अटक केली. त्यांना ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणल्यानंतर किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यावर त्यांना 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टायगरवर गोळीबार केल्यानंतर आरोपी सुरतला पळाले होते. त्यानंतर ते पुढे कोटाला गेले आणि तेथे पकडले गेले. सुरतमध्ये दोन पिस्तुल पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. या दोन्ही पिस्तुल गुह्यात वापरलेल्या असाव्यात असा पोलिसांना दाट संशय आहे. या पिस्तुल आता न्यायप्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. मग घटनास्थळावर सापडलेल्या पुंगळ्या आणि या पिस्तुल जर एकमेकांना जुळल्या की त्या गुह्यातल्याच पिस्तुल असल्याचे स्पष्ट होईल.

आरोपींनी गोळय़ा झाडण्याचा सरावही केला होईल

टायगर श्रॉफ याच्यावर प्रत्यक्ष गोळीबार करण्याआधी आरोपींनी त्याचा सराव केला होता. मुंबईजवळच आरोपींनी गोळय़ा झाडण्याचा सराव केला होता. एकाने दोन तर दुसऱ्याने एक गोळी सरावावेळी झाडल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहेत.

Comments are closed.