गौरीचा मृत्यू झाल्याचं समजताच अनंतने स्वत: भिंतीवर डोकं आपटून घेतलं; शरीरावर एकूण 28 जखमा, पोलि


मुंबई : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेची (Anant Garje) पत्नी डॉ. गौरी पालवे (Gauri Garje Death Case) मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गौरी पालवे (Gauri Garje Death Case) यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. गौरीच्या (Gauri Garje Death Case) माहेरच्या मंडळींनी तिच्या सासरच्या लोकांवरती गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी पोलिसांनी गौरी पालवे हिचा पती अनंत गर्जे याला अटक केली आहे. पोलिसानी या प्रकरणी तपास केला असता पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज लागलेले आहे. तर अनंत गर्जेच्या शरीरावरील जखमांबाबत देखील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (Gauri Garje Death Case)

गौरी पालवेंचा मृत्यू झाल्याची माहिती समजल्यानंतर अनंत गर्जेने (Gauri Garje Death Case) आपलं डोकं भिंतीवर आपटण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून त्याला डोक्याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे. त्याचबरोबर अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला होता. त्यामुळे घराच्या खिडकीला ज्या व्यक्तीने जाळ्या बसवल्या त्यालाच जाळीमधून आतमध्ये प्रवेश करता येतो का? याचं प्रात्याक्षिक देखील दाखवायला सांगण्यात आलं होतं.

Gauri Garje Case: अनंतच्या शरीरावर ताज्या स्वरुपाच्या 28 जखमा

त्याचबरोबर अनंतच्या शरीरावर 28 जखमा आहेत. या जखमा ताज्या आहेत. तसेच गौरी पालवे आणि अनंत यांच्यात झटापटी झाल्याच्या जखमा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून कोर्टात याबाबत माहिती देण्यात आली आहे. अनंतची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. तसेच मानसशास्त्रीय तपास केला जाणार आहे. तसेच तज्ज्ञांच्या माध्यातून या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाणार आहे. याशिवाय आवश्यक असेल तेव्हा अनंतची पोलीस कोठडी घेण्याचे अधिकार अबाधित राहावेत, अशी पोलिसांची भूमिका असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

Gauri Garje Case: पोलिसांनी अंनतच्या जुन्या प्रेयसीचाही नोंदवला जबाब

गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी वरळी पोलिसांनी अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला आहे. अनंतसोबत 2022 पासून कोणताही संबंध नव्हता. गौरीच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही, असा जबाब महिलेने पोलीस चौकशीत दिला आहे.दरम्यान, अनंत गर्जे याला या प्रकरणी आतापर्यंत कोर्टात तीनवेळा हजर करण्यात आलं आहे. एफआयआरमध्ये अनंतच्या जुन्या प्रेयसीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे तिचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.