तब्बल 13 कोटी 37 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच जणांना अटक, मुंबईच्या RPF पोलीसांची मोठी कारवाई

मुंबई गुन्हेगारीच्या बातम्या: मुंबईच्या आरसीएफ पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल 13 कोटी 37 लाख 60 हजार किमतीचे एकूण सहा किलो 688 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्स जप्त केले आहे. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिकची चौकशी करत आहेत.

दरम्यान, रेहान शेख नावाचा तरुण हा आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना एमडी ड्रग्सची विक्री करताना आढळून आला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याच्याकडे साडे चार लाखाचे एमडी सापडले होते. त्याच्याकडे कसून तपास केला असता पोलिसांना आणखी चार एमडी विक्रेत्या आरोपींची माहिती मिळाली. त्यांना अटक करून पोलिसांनी या पाचही आरोपींकडून तब्बल तेरा कोटी पेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्स हस्तगत केले आहे. तसेच ही एक मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.दरम्यान, 13 कोटी 37 लाख 60 हजार किमतीचे एकूण सहा किलो 688 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्स नेमके आले कोठून? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी पोलिस कसून तपास करत आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे कोणाशी कनेक्शन आहे याचा तपासही पोलिस घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Nagpur Crime News : फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टी नागपूर पोलिसांनी उधळली; 4 महिलांसह चौघा ‘झिंगाट’ मित्रांना अटक

अधिक पाहा..

Comments are closed.