मुंबईत आणखी दोन नवीन झोन, चार पोलीस स्टेशन
मुंबई पोलीस आयुक्तालयात आता नव्याने दोन झोन (परिमंडळ)वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण झोनची संख्या वाढून ती आता 15 झाली आहे. याशिवाय प्रत्येक प्रादेशिक विभागातील झोनची जुनी ओळख बदलून त्याचे नवीन नामकरण करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयात सद्यस्थितीत बंदर परिमंडळ धरून एकूण 13 झोन आहेत. पण त्यात आता आणखी दोन नव्या झोनची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे मुंबईत 15 झोन असणार आहेत. मात्र हे करत असतानाच प्रत्येक प्रादेशिक विभागातील झोनची वेगळी ओळख तयार करण्यात आली आहे. नव्या पुनर्रचनेनुसार आता दक्षिण (1 ते 3), मध्य (1 ते 3), पूर्व (1 ते 3), पश्चिम (1 ते 3), उत्तर (1 ते 3) असे झोन असणार आहे. यामुळे परिमंडळ 1 ते 13 अशी ओळख पुसली जाणार आहे. दरम्यान, यापैकी पूर्व, परिमंडळ-2 मध्ये असल्फा, पूर्व, परिमंडळ-3 मध्ये महाराष्ट्रनगर, पश्चिम परिमंडळ-1 मध्ये गोळीबार, उत्तर, परिमंडळ-2 मध्ये मढ मार्वे अशी चार नवी पोलीस ठाणी सुरू करण्यात येणार आहेत.
Comments are closed.