सूर्या नाही तर रोहित शर्माचा लाडका झाला कर्णधार; मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 साठी मुंबई संघ : मुंबईने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माचा लाडका खेळाडू शार्दूल ठाकूरला मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि सरफराज खान यांसारखे स्टार खेळाडूही या संघात आहेत. मागील वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने हा किताब जिंकला होता, पण यंदा अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे. अनुभवी अजिंक्य रहाणे यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

विकेटकीपर म्हणून अंगकृष रघुवंशी आणि हार्दिक तमोर यांना संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि तनुश कोटियन यांच्यावरही मोठी जबाबदारी असेल. यंदाच्या रणजी हंगामात फक्त पाच सामन्यांत तीन शतकं आणि एक अर्धशतक झळकवत तब्बल 530 धावा करणाऱ्या सिद्धेश लाडलाही संघात स्थान मिळाले आहे. रणजीत लाडची चमकदार कामगिरी पाहता, टी-20 फॉरमॅटमध्येही त्याची बॅट दणाणेल अशी अपेक्षा आहे.

सूर्यकुमार यादववर विशेष लक्ष

भारताचा टी-20 कर्णधार बनल्यानंतर सूर्यकुमार यादवची बॅट फारशी चाललेली नाही. त्यामुळे या स्पर्धेत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. फॉर्म परत मिळवण्यासाठी हा टूर्नामेंट ‘गोल्डन चान्स’ मानला जात आहे.

26 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीचा एलीट गट 26 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. पहिला टप्पा लखनऊ, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाता येथे होईल, तर नॉकआउट सामने इंदूरमध्ये खेळले जातील. मुंबईचा पहिला सामना 26 नोव्हेंबर रोजी लखनऊ येथे रेल्वेविरुद्ध होणार आहे. एकंदरीत, अनुभवी खेळाडूंसह तरुण प्रतिभेचा उत्तम मेळ असलेला हा मुंबईचा संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई संघ (सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 साठी मुंबई संघ)

शार्दुल ठाकूर (कर्णधार), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), अंगकृष्ण रघुवंशी (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, सूर्यकुमार यादव, सर्फराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, साईराज पाटील, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शम्स मुलाणी, तुषार देशपांडे, इरफान उमैर.

हे ही वाचा –

Vaibhav Suryavanshi Ind A vs Ban A : वैभव सूर्यवंशी सुपर ओव्हरमध्ये का उतरला नाही? ड्रेसिंग रूममध्ये नेमकं काय घडलं? कर्णधार जितेश शर्मा स्पष्टचं बोलला

आणखी वाचा

Comments are closed.