विधानभवन परिसरातील मारहाण प्रकरणाच्या तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आ
मुंबई: विधानभवनात झालेल्या मारहाण (Mumbai vidhan bhavan clash) प्रकरणी तपास थांबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे मरीन लाईन्स पोलिसांना दिले आहेत. जितेंद्र आव्हाड समर्थक नितीन देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्या. चंद्रशेखर व गौतम अखंड यांच्या खंडपीठाने बुधवारी हे निर्देश (Mumbai vidhan bhavan clash) दिले आहेत. बुधवारी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांचे वकील राहुल आरोटे यांचा गुन्हा दाखल करण्याचे कृत्य राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा युक्तिवाद केला होता. देशमुख यांच्या वतीने दाखल याचिकेत पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. मात्र त्याबाबतचे कोणतेच पुरावे उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. न्यायालयाने तपासाला स्थगिती देत पुढील सुनावणी १२ नोव्हेंबरला ठेवली आहे.(Mumbai vidhan bhavan clash)
Mumbai vidhan bhavan clash: नेमकं प्रकरण काय?
जुलै महिन्यामध्ये विधानभवनाच्या परिसरामध्ये भाजप आणि शरद पवार गटातील समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीचा पुढील तपास थांबविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मरिन लाइन्स पोलिसांना दिले आहेत. दि. १७ जुलै रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्या. चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांत विधानसभेत एकमेकांविरोधात केलेल्या वक्तव्यावरून हाणामारी झाली होती. या घटनेबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रद्द करावा, यासाठी देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. जुलै महिन्यात देशमुख आणि पडाळकर यांचे समर्थक सर्जेराव टकले यांची दंडाधिकारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. देशमुख यांचे वकील राहुल अरोटे यांनी युक्तिवाद केला की, गुन्हा दाखल करण्याचे कृत्य राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. त्यामुळे तपासाला स्थगिती द्यावी.
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकाला पोलिसांनी अटक केलं होतं.
Mumbai vidhan bhavan clash: कामात हस्तक्षेपाचा केल्याचा आरोप
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, भारतीय न्यायसंहितेच्या कलम १३२ (लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) अंतर्गत केलेल्या आरोपांचे समर्थन करण्यासाठी कोणतेच पुरावे उपलब्ध नाहीत, असा दावा याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
Mumbai vidhan bhavan clash: युक्तिवाद काय झाला?
कडक सुरक्षा असलेल्या राज्य विधिमंडळाच्या आवारात विधिमंडळ प्रवेशपास वापरून प्रवेश करण्यात आला होता. त्यामुळे आवारात बेकायदेशीररीत्या जमल्याचा आरोप टिकत नाही, असा युक्तिवाद देशमुख यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. न्यायालयाने तपासाला स्थगिती देत पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.