पालिका दोन शाळा बंद करणार विद्यार्थीच नसल्याचे कारण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विद्यार्थीच नसल्याचे कारण देत पालिकेने दोन शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रतीक्षानगर शीव येथील बालसंस्कार प्राथमिक शाळा आणि कुरार व्हिलेज मालाड येथील साई विद्यामंदिर या शाळा बंद करण्यात येणार आहेत. या ठिकाणी अतिरिक्त ठरणारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे जवळच्या इतर शाळांमध्ये आवश्यकतेनुसार समायोजन करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शीव येथील बालसंस्कार मराठी शाळेला मार्च १९८२ मध्ये पहिली ते चौथीसाठी शिक्षण समिती ठरावानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यापुढील कालावधीत शाळेच्या मागणीनुसार वेळोवेळी मान्यतेची मुदतवाढ दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र बालसंस्कार प्राथमिक शाळेत मराठी माध्यमाच्या प्राथमिक अनुदानित शाळेची सध्याची विद्यार्थी संख्या ‘निरंक’ आहे.

मालाडच्या शाळेतही विद्यार्थी नाहीत
मालाडच्या साई विद्यामंदिर या हिंदी माध्यमाच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेला जून १९९९ मध्ये मान्यता देण्यात आली होती. यानंतर शाळेने केलेल्या मागणीनुसार वेळोवेळी मान्यतेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत या शाळेत एकही विद्यार्थी नसून २ सहायक शिक्षक, १ लिपिक, १ शिपाई असा कर्मचारी वर्ग आहे.

Comments are closed.